Ujani Dam Water : तब्बल १६४ किलोमीटरपर्यंत विस्तारले उजनीचे पाणी

Ujani Water Storage : गतवर्षी धरण केवळ ६४ टक्केच भरले होते आणि उन्हाळ्यात आजवरील सर्वात निच्चांकी पातळी (उणे ६० टक्के) गाठली होती.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी धरणात सध्या १२२.७२ टीएमसी पाणी असून ते पाणी १६४ किलोमीटर दूरवर पसरले आहे. धरणाची मूळ रुंदी दोन किमी आहे, पण कालठणजवळ आठ किमी तर वांगी, कळाशी, कुगावजवळ नऊ किलोमीटर रुंदी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतकऱ्यांना उन्हाळ्यात तीन आवर्तने सोडली जाणार असून १५ ऑक्टोबरनंतर त्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन होईल.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्यांमध्ये उजनी धरण ११०.२५ टक्के भरल्याने आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी धरण केवळ ६४ टक्केच भरले होते आणि उन्हाळ्यात आजवरील सर्वात निच्चांकी पातळी (उणे ६० टक्के) गाठली होती.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणाबाबत मोठी अपडेट समोर, उन्हाळ्यात अशी राहणार स्थिती

यावर्षी उजनी धरण ऑगस्टमध्येच भरल्याने धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीतून पाणी सोडावे लागले. आगामी उन्हाळा संपेपर्यंत धरण प्लसमध्येच राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीसह ४२ योजनांसाठी उजनीतून पाणी सोडले जाते. जिल्ह्यातील १००हून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर शहर, धाराशिव या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

Ujani Dam
Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

पूर नियंत्रणासाठी सोडले १०८.५५ टीएमसी पाणी

उजनी धरण सध्या ११०.२५ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणात अजून अर्धा टीएमसी पाणी मावते. अजून काही दिवस पावसाची शक्यता असल्याने तेवढी जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे.

४ ऑक्टोबरपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे बंद केले असून सध्या धरणावरील विद्युत प्रकल्पासाठी सांडव्यातून १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान, ४ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबर (१७ ते २२ सप्टेंबर वगळून) या काळात एकूण ६२ दिवस धरणातून पूरनियंत्रणासाठी भीमा नदीतून तब्बल १०८.५५ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com