Water Scarcity : यंदा मार्चपासूनच टंचाईचे चटके

Water Crisis : प्रकल्पांमध्ये पाणी असूनही उष्णतामान कमालीचे वाढल्याने पाणीटंचाईला मार्चपासूनच प्रारंभ झाला. त्यातच आता तर तापमानाचा कहर होतो आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Buldana News : गेल्या मोसमात जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस झाला. प्रकल्पही तुडूंब भरले होते. त्यामुळे आता पाणीटंचाई जाणवणार नाही, असे वाटत होते. मात्र, यंदा मार्च महिन्याच्या मध्यापासूनच टंचाईने डोके वर काढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील ११९ गावे टंचाईच्या फेऱ्यात अडकली असून १३३ खासगी विहिरींवरून पाणीपुरवठा करण्याची वेळ निर्माण झाली आहे.

प्रकल्पांमध्ये पाणी असूनही उष्णतामान कमालीचे वाढल्याने पाणीटंचाईला मार्चपासूनच प्रारंभ झाला. त्यातच आता तर तापमानाचा कहर होतो आहे. या उष्णतामानाचा फटका हजारोंना बसतो आहे. ११९ गावे सध्या टंचाई झेलत आहेत. यात दर आठवड्यात भरच पडते आहे. सध्या जवळपास १३३ खासगीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ३२ लाख १५ हजारांचा खर्च सुद्धा झाला.

Water Scarcity
Water Scarcity : वारवंड परिसरात तीव्र पाणीटंचाई

विशेष म्हणजे सध्या २१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यावर आजवर ५१ लाख ३५ हजारांचा खर्चही झाला. एप्रिल पूर्ण होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणाचा खर्च पाऊण कोटींच्या पुढे गेला आहे. उन्हाच्या झळा या थेट जून महिन्यापर्यंत बसत असतात. त्यामुळे यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढू शकते.

उष्णतामानाचा कहर

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक उष्णता जाणवत आहे. गेल्याच आठवड्यात शेगाव येथील एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवर परिसरात पानकावळ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. जिल्ह्यातील जंगलांमध्ये प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. यावर्षी पाऊस वेळेवर न आल्यास टंचाईग्रस्त गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Water Scarcity
Nanded Water Scarcity : ऊन सोसल, पण तहान कशी भागवायची?

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी इतका पाऊस झाल्यानंतरही उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील ११४५ गावांसाठी १३३४ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी ११ कोटी ९६ लाखांचा आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी तीव्र टंचाईग्रस्त १३१ गावांसाठी १६८ उपाय योजना सुचविण्यात आल्या.

२१ गावात २३ टँकरने पाणीपुरवठा करणे, १३३ गावांसाठी ११९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे या योजनांचा समावेश होता. त्यापैकी आतापर्यंत ११९ गावांसाठी १५६ उपाययोजना करून ८३ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आला. या उपाययोजनांमध्ये ८ तालुक्यातील टंचाईग्रस्त ११९ गावांसाठी १३३ खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच ५ तालुक्यातील २१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टँकरग्रस्त गावे

जिल्ह्यात ५ तालुक्यांतील २१ गावांमध्ये २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरग्रस्त गावात मेहकर तालुक्यातील पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा, पाथर्डी, उटी, बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड, चौथा, देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा, निमखेड, कुंभारी, सावखेड नागरे, चिखली तालुक्यातील कोलारा, भालगाव, श्रीकृष्णनगर, सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ, पांग्री उगले या गावांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com