Sand Policy : आता वाळू मिळणार ऑनलाइन

Team Agrowon

राज्यातील बांधकामांना अवघ्या ६०० रुपयांत वाळू देण्याचे धोरण बदलण्यात आले आहे. आता यापुढे ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्यात येणार आहे.

Sand Policy | Agrowon

ही वाळू ‘ना नफा ना तोटा’ पद्धतीने पुरविण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत नवीन वाळू धोरणाला मान्यता देण्यात आली आहे.

Sand Policy | Agrowon

वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Sand Policy | Agrowon

नदी, खाडीपात्रातून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन याकरिता संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर असेल.  

Sand Policy | Agrowon

एप्रिल २०२३ मध्ये आणलेल्या वाळू धोरणात प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रतिब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रिक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित केला होता.

Sand Policy | Agrowon

प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल.

Sand Policy | Agrowon

ही समिती वाळू गट निश्चित करून त्यासाठी ऑनलाइन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल.

Sand Policy | Agrowon
|