Hingoli Farmer : शेतकरी संकटात असताना पीक विमा कंपन्यांचा पैसा कुठय? उद्धव ठाकरेंचा सवाल

Farmer Meet Uddhav Thackeray कर्जच्या परतफेडीसाठी स्वतःचे अवयव विक्री करण्याची तयारी दर्शवणाऱ्या हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Hingoli Farmer
Hingoli Farmer Agrowon

Farmers Sell Human Organs : यंदा खरीपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला. येलो मोझॅकमुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यात आता अवकाळी पावसाचे संकट ओढवला आहे. तर दुसरीकडे शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आली असून बँकेचे कर्जफेड करु न शकणाऱ्या हतबल झालेल्या हिंगोलीतील शेतकऱ्यांनी आपले अवयव विक्रीची तयारी केली आहे. या शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Hingoli Farmer
Ajit Pawar : शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी अमित शहा यांची भेट घेणार : अजित पवार

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगाम वाया गेला. सोयाबीन, कापूस पिकांसाठी पिकविमा द्यावा, दुष्काळ जाहीर करावा, बँकेची कर्जफेड परत करावी, अन्यथा आमचे मानवी अवयव विकत घ्यावे, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील १० शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली होती.

अवयव विक्रीची तयारी दर्शवणाऱ्या गोरेगाव परिसरातील शेतकरी हिंगोलीहून मुंबईत पोहोचले. त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खा. विनायक राऊत उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळी आली असेल तर या सरकारला नायक नाही म्हणायची, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दुष्काळ आणि आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. सरकारने पंचनाम्याचा खेळ थांबवा. सरसकट नुकसान भरपाई द्या नाही तर कर्ज माफी करा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात येत आहे.

पीक विमा योजनेत १ कोटी ७० हजार शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवला. शेतकऱ्याच्या हिस्स्यापोटी राज्य शासनाने ८ हजार रुपये कोटी विम्या कंपन्यांना दिले रुपये दिले. आज या विमा कंपन्याची कार्यालय बंद आहेत. त्यांचे प्रतिनिधी फोन उचलत नाहीत. सरकारला जुमानत नाहीत. विम्याचा पैसा कोणाच्या खिशात जातो. पीक विमा कुठे गेला आणि किती दिला? याचा शोध घेतला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com