Uddhav Thackeray : सरकार आपल्या दारी आलं तेव्हा काय दिलं ? उद्धव ठाकरे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

Uddhav Thackeray inspect the drought : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीजवळील दुष्काळी भागांमध्ये पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Uddhav Thackeray in Ahmednagar : सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस (Rain) पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदील झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुष्काळग्रस्त (drought condition) भागाची पाहणी करण्यासाठी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिर्डीनजीकच्या गावांमधील बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

Uddhav Thackeray
Dhangar Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला चोप

उद्धव ठाकरे कोपरगावातील कातरी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. अहमदनगरमध्ये गेल्या २५ दिवसांपासून पावसाचे टिपूसही पडलेले नाही. त्यामुळे शेतातील उभी सोयाबीनची पिके करपून गेली आहेत. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याची कैफियत मांडली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत असताना तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याच्या सूचना केल्या. तसेच शासन आपल्या दारी आले तेव्हा काय दिले? असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला भेटता आले नाही. तसेच निवेदन देता आले नाही, असे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com