Crop Loan: विना विलंब, बिनशर्त पीककर्ज मंजूर करा

Farmers First: शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवून देण्यासाठी मराठवाडा स्तरावर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित ‘बँकांची शाळा’ या आंदोलनात्मक उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत धडक देत शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारल्याचा जाब विचारण्यात आला.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवून देण्यासाठी मराठवाडा स्तरावर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित ‘बँकांची शाळा’ या आंदोलनात्मक उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत धडक देत शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारल्याचा जाब विचारण्यात आला.

विना विलंब व बिनशर्त शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. या वेळी किती शेतकऱ्यांचे पीककर्जाचे अर्ज आले, किती पीककर्ज अर्ज मंजूर झाले, किती अर्ज नामंजूर झाले, प्रलंबित अर्ज किती व त्यांची कारणे काय, पीककर्जाची उद्दिष्टे किती, आतापर्यंत किती पूर्तता झाली आणि सिबिल, थकबाकीमुळे किती शेतकऱ्यांचे पीककर्जाचे अर्ज नाकारण्यात आले, याची माहिती घेण्यात आली.

Crop Loan
Crop Loan : नांदेडला पीककर्ज वाटपात नऊ खासगी बँका शून्यावर

या प्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, विजय वाघमारे, चंद्रकांत गवई, राजू इंगळे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनीता सोनवणे, सुनीता औताडे व भागूआक्का शिरसाट उपस्थित होते.

Crop Loan
Crop Loan : दीड लाख शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार

सद्यःस्थितीत शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्या वतीने पीकविम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पीककर्ज मिळण्याची आवश्यकता असल्याने विना विलंब व बिनशर्त शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करा करा, अशा सूचना वजा निवेदन शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले.

या परिस्थितीत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी ‘बँकांची शाळा’ हा आंदोलनात्मक कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. आपण शेतकऱ्यांचे पीककर्ज त्वरित मंजूर करावे. कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पीककर्ज नाकारू नये, अशी मागणी करत शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com