
Ahilyanagar News : पीक नसतानाही कांद्याचा पीकविमा उतरविल्याचा प्रकारानंतर आता फळपिकांच्या बाबतीतही असा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात उघड झाला आहे. यंदाच्या मृग बहरात पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत २०५५ शेतकऱ्यांना शेतात फळपिकांची लागवड नसतानाही पीकविमा उतरवला तर ६६९ शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा पीकविमा घेतल्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघड झाला आहे.
कृषी विभागाने या शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द केले आहे. या तपासणीमुळे केंद्र आणि राज्य सरकारचे विमा हप्त्यापोटी खर्च होणाऱ्या ९० लाख रुपयांची रक्कम वाचली आहे. आता संबंधित शेतकऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगरला लागवड नसताना पीकविमा भरल्याचा कांद्याबाबतचा प्रकार उघड झाल्यानंतर आता फळबागांच्या बाबतही असा प्रकार झाल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, श्रीगोंदा, पाथर्डी, राहाता, कर्जत, जामखेड, संगमनेर, पारनेर, कोपरगाव, राहुरी आणि नेवासा या सात तालुक्यांत ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी २ हजार ५६ हेक्टरवर पेरणी नसतांना, पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून सुमारे १ कोटी २७ लाखांचा विमा उतरवला होता.
ही बाब कृषी विभागाच्या तपासणीनंतर समोर आल्यानंतर कृषी विभागाने ७ हजार २४१ शेतकऱ्यांचा १ कोटी २७ लाख रुपयांचा विमा रद्द केला. कांद्यासह अन्य पिकांप्रमाणे १२ जून २०२४ पासून मृग व आंबिया बहर २०२४-२५ व २०२५ २६ या आर्थिक वर्षासाठी फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.