.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nagar News : मुळा धरणामध्ये ८७ टक्के पाणीसाठा नियंत्रित ठेवून, सोमवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता धरणातून २ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरू केला आहे. निळवंडे धरणातूनही दोन हजारांवरून तीन हजार क्युसेकने विसर्ग वाढवला आहे.
नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून मुळा धरणाकडे पाहिले जाते. मुळा धरणाची एकूण साठवण क्षमता २६ टीएमसी एवढी आहे. धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाइड व अप्पर गाइड कर्व्हनुसार १५ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी (ता.१२) दुपारी ३ वाजता मुळा धरणात पावणेतेवीस टीएमसी (८७ टक्के) पाणीसाठा झाल्यानंतर २ हजार क्युसेकने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
धरणात १८७३ क्युसेकने आवक सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून, मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अकोला तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी पट्ट्यातील जोरदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणातूनही दुपारी साडेतीन हजार क्युसेकने पाणी सोडले. भंडारदरा धरणातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.