Affected Farmer Information : नुकसानग्रस्त पावणे दोन लाख शेतकऱ्यांची नावे ‘अपलोड’

Affected Farmers Information have been Uploaded : नुकसानग्रस्त २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांपैकी १ लाख ८० हजार १७१ शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात झाल्या आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२३ दरम्यान झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाने ३३२ कोटी ९६ लाखांची आर्थिक मदतही मंजूर केली आहे. यासाठी नुकसानग्रस्त २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांपैकी १ लाख ८० हजार १७१ शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात झाल्या आहेत. जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत.

जिल्हयात नोव्हेंबरअखेर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने १ हजार ७५२ गावांतील २ लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांचे १ लाख ८९ हजार ६८१ हेक्टरवरील कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, आंबा, मोसंबी, पेरू, संत्रा आदी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानाचे कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केले. त्यानुसार नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले. ३१ जानेवारी रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने ३३३ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे

Crop Damage
Crop Damage Compensation : खरे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित

दरम्यान जिरायती शेतीसाठी या आधी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मदत मिळत होती त्याऐवजी आता १३ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२ हजार ५०० रुपयांऐवजी आता ३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. याद्या अपलोड झालेल्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

दरम्यान यावर्षी २६ फेब्रुवारीला गारपिट व अवकाळी पाऊस झाला होता. या संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. अंतिम सर्व्हेक्षण अहवालानुसार चार तालुक्यातील ९ हजार १५२ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने २२ मार्च रोजी शासनाला सादर केला असून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

अपलोड झालेल्या याद्या

तालुका अपलोड शेतकरी संख्या

मूर्तीजापूर ३५४५९

तेल्हारा १६५३१

अकोट ४३८३२

अकोला ८५६९

बार्शीटाकळी ४१२१५

बाळापूर १०९८६

पातूर २३५७९

एकूण १ लाख ८० हजार १७१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com