Crop Damage Complaints : दोन लाख शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या तक्रारी

Kharif Season Crop Issue : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस व अन्य कारणाने पिकांचे नुकसान झाल्याबाबत २ लाख ८ हजार १९६ तक्रारी आल्या आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस व अन्य कारणाने पिकांचे नुकसान झाल्याबाबत २ लाख ८ हजार १९६ तक्रारी आल्या आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला आहे. आता त्या त्या मंडलात झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार पीकविम्याची नुकसान भरपाई किती द्यायची यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा खरिपात ६ लाख ९९ हजार ५०५ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात प्रामुख्याने ७४ हजार ९१५ हेक्टरवर बाजरी, १ लाख ६९ हजार हेक्टरवर सोयाबीन, १ लाख ५३ हजार हेक्टवर कापूस, पन्नास हजार हेक्टरवर मूग, तर ६४ हजार हेक्टवर उडदाचे पीक घेतले.

Crop Damage
Paddy Crop Damage : कालव्याच्‍या पाण्यामुळे खांबमध्ये भातशेतीचे नुकसान

यंदा खरिपात पावसाची स्थिती चांगली होती. त्यामुळे पिके चांगली आली. परंतु पीक काढणीच्या काळात अनेक ठिकाणी अति पाऊस, अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले तर भरपाई मिळावी यासाठी पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला नुकसान झाल्याची माहिती द्यायची असते, त्यानुसार यंदा खरिपात २ लाख ८ हजार १९६ तक्रारी दिलेल्या आहेत.

Crop Damage
Citrus Crop Damage : गिरणा पट्ट्यातील लिंबू, मोसंबी बागायतदारांना हवा मदतनिधी

त्यात अकोल्यात १२३५, जामखेडमधून १५ हजार ६५७, कर्जतमधून ३५३०, कोपरगावामधून १० हजार १७७, नगर तालुक्यात ५५८४, नेवाशातून ४९ हजार ५०७, पारनेरमधून १९०७, पाथर्डीत ३६ हजार २२८, राहात्यातून ४७८५, संगमनेरातून १९८०, शेवगावातून ४० हजार ७४०, श्रीगोंद्यातून ९८७० व श्रीरामपुर तालुक्यात ११ हजार ५८२ तक्रारी आल्या आहेत.

काढणीपश्‍चात पंचनामेही होतील

अहिल्यानगर जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी, मूग, उडदाचे काढणी केल्यानंतर जोरात आलेल्या पावसामुळे काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. काढणीपश्‍चात नुकसानीबाबत आलेल्या तक्रारीचे काही पंचनामे राहिले आहेत. ते लवकर होतील असे सांगितले जात आहे. मात्र आता पंचनामे करण्याला पीक उपलब्ध आहे का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com