Fertilizer Sales Licenses : विकास संस्था, शेती सेवा केंद्रांचे दोनशे खतविक्री परवाने प्रलंबित

Fertilizers Licence : कोल्हापुर जिल्ह्यातील विकास सेवा संस्था आणि शेती सेवा केंद्र यांचे सुमारे २०० खतविक्री परवाने प्रलंबित असल्याने सेवा संस्थांच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Fertilizers
Fertilizers Agrowon

Kolhapur News : कोल्हापुर जिल्ह्यातील विकास सेवा संस्था आणि शेती सेवा केंद्र यांचे सुमारे २०० खतविक्री परवाने प्रलंबित असल्याने सेवा संस्थांच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेवा संस्थेत खते मिळत नसल्याने रब्बी हंगाम व ऊस लागणीच्या कामांना खीळ बसली आहे.

खतविक्री परवाने तातडीने द्यावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या महिन्यात जिल्हा गुणनियंत्रक लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने परवाने प्रलंबित आहेत.

Fertilizers
Bio-Fertilizer Production : बाजारातील मागणीनुसार जैविक खत उत्पादनावर भर द्या

केंद्र शासन, सहकार विभागाच्या वतीने विकास संस्थांना खतविक्री करण्यास, खत विभाग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही वर्षांपूर्वी विकास संस्थेत ७० टक्के रोख, तर ३० टक्के खत खरेदीसाठी कर्जपुरवठा केला जात होता. ‘नाबार्ड’ने यामधे बदल केला. यामुळे सात वर्षांपासून बहुतांश संस्थांची खतविक्री सेवा बंद झाली आहे.

आता केंद्र शासन सहकार खात्याच्या वतीने विकास संस्थांना १५१ पद्धतीचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खतविक्री करण्यासाठी खत परवाना काढणे बंधनकारक आहे. कृषी खात्याच्या वतीने खतविक्री करण्यासाठी परवाने दिले जातात. मात्र परवाने प्रलंबित पडले आहेत.

विकास संस्थांना गुणनियंत्रक परवाना आहे का, हे विचारतात, माहिती घेतात. मात्र, खतविक्री परवाने वेळेवर मिळत नसल्यामुळे खतविक्री करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेती सेवा केंद्र व विकास सेवा संस्थांचे सचिव, तालुका कृषी अध्यक्ष, जिल्हा कृषी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.

Fertilizers
Fertilizer Management : खतविक्री अन् वापर व्यवस्था सुधारा
केंद्र शासनाच्या वतीने विकास संस्थांना खत विक्रीसाठी मुभा दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जात्मक खते मिळतील, संस्थेचाही व्यवसाय होईल. मात्र, परवाने वेळेवर मिळत नाहीत. प्रस्ताव देऊन दोन महिने झाले तरी परवाना मिळालेला नाही.
पांडुरंग पाटील, सचालक, केदारलिंग विकास संस्था, चुये
परवाने तपासणी होऊन दिवसा वीसप्रमाणे परवाने देऊन पूर्ण होतात. परवाने ऑनलाइन पद्धतीने महा-ई-सेवा केंद्रांवर दिले जातात. मात्र ही माहिती संस्था व परवानाधारकांना मिळत नाही. यामुळे संबंधितांनी ऑनलाइन फॉर्म भरले त्या ठिकाणी माहिती घ्यावी.
अरुण भिंगारदेवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक

लाभार्थी परवानाधारकांचे हेलपाटे

जिल्ह्यात १८०० कृषी सेवा केंद्रे आहेत. बियाणे विक्रीचे १२५० परवाने, तर ११०० कीटकनाशक परवाने दुकानदार व सेवा संस्था विक्री केंद्रे नोंद आहेत. दर पाच वर्षांतून एकदा खतविक्री, बियाणेविक्री परवाने नूतनीकरण करावे लागतात. महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परवाना फॉर्म भरला जातो.

त्याच ठिकाणी कृषी खात्याकडून परवाने ऑनलाइन पद्धतीने दिले जातात. मात्र ही माहिती महा-ई-सेवा केंद्रचालक संबंधितांना देत नाही किंवा माहिती ऑनलाइन मिळाल्याची माहिती घेतली जात नाही. यामुळे लाभार्थी परवानाधारक हेलपाटे मारत आहेत. परवाने नूतनीकरणासाठीही वेळ लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com