Crop Insurance News : सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

Crop Insurance Scheme : राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
Benefit of Fruit Crop Insurance
Benefit of Fruit Crop InsuranceAgrowon

Pune News : राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात पुणे जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार २४० शेतकऱ्यांनी एकूण एक लाख २६ हजार ३७९ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला. यामध्ये सर्वात जास्त शिरूर तालुक्यातील एकूण ३९ हजार ९७६ शेतकऱ्यांनी विमा काढला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

यंदा पीकविमा योजनेतील सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदतवाढ देऊन ती ३ ऑगस्टपर्यंत करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना तत्पर सुविधा न मिळल्याने व कागदपत्रे मिळवताना आलेल्या अडचणींमुळे पीक विमा नोंदणीसाठी अनेक शेतकऱ्यांवर शेवटच्या दिवसापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्याची स्थिती आहे.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : आंबा, काजू पीकविमासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकणार आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या योजनेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ होती. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : हवामानाधारित फळपीक विमा योजनेत चार पिकांचा समावेश

नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार ६११ कोटी ९ लाख रुपयांची भरपाई मिळू शकणार आहे. चालू वर्षी पीक विमा योजनेविषयी माहिती देण्यासाठी दोन प्रचाररथांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती.

तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली. गावागावात कॅम्प, सभा, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे, वृत्तपत्र, शेतकऱ्यांना मोबाइलवर मेसेज करून पीकविम्याबाबत जागृती केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेत सहभागी झाल्याचे दिसून आले.

तालुकानिहाय पीकविमा योजनेत सहभागी झालेली शेतकरी

तालुका --- शेतकरी संख्या --- संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आंबेगाव -- १९७५२ -- ९८१२.४९

बारामती -- ३०४६३ -- १६३३५.४०

भोर -- ८१७९ -- ३६५०.५४

दौड --- ५०९१ -- ८०२१.३६

हवेली --- ३१६७ --- १४४२.२२

इंदापूर -- १३,७८३ --९४६८.४५

जुन्नर -- ३२००६ -- १९२०३.९०

खेड -- २३२३९ -- १०७०६.९१

मावळ -- १५६२७ --- ७७४०.७१

मुळशी -- ५४२५ -- २१९९.०७

पुरंदर -- २२,७२८ --- १०८७८.८०

शिरूर -- ३९,९७६ -- २४३४७.९६

वेल्हे --- ६८०४ -- २५७२.१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com