PM Kisan Installment: ‘पीएम किसान’चा विसावा हप्ता जूनमध्ये

PM Kisan 20th Installment: राज्यातील ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना जूनमध्ये पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. यंदा नवी नोंदणी व सुधारित माहितीमुळे लाभार्थी संख्या ५० हजारांनी वाढणार आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील ९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान (पीएम) किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.‘पीएम किसान’मधील नवी नोंदणी किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गावपातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढेल. ही संख्या किमान ५० हजारांनी वाढून ९३.३५ लाखांच्या पुढे जाणार आहे. राज्यात एकोणिसावा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९२.८९ लाख इतकी होती. त्यापोटी एक हजार ९६७ कोटींहून अधिक रक्कम वाटली गेली होती. विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षाही जास्त राहील. कारण, भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता ९३.३५ लाखांच्या पुढे गेली आहे.

PM Kisan
PM Kisan: राज्य सरकारचा निर्णय; नव्या योजनेत करणार गुंतवणूक

नोंदणी मोठी; मात्र क्रियाशील कमी

केंद्र शासनाने २० वा हप्ता जूनमध्ये मिळेल, याचे संकेत दिले आहेत. मात्र, निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पीएम किसान योजनेच्या आतापर्यंतच्या सलग १९ हप्त्यांपोटी एकूण ३५ हजार ५८६ कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी राज्यभरातून १२३ लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

परंतु त्यापैकी पीएम किसानच्या संकेतस्थळावर क्रियाशील असलेले शेतकरी केवळ ९७.६६ लाख आहेत. अर्थात, त्यापैकी ७९ हजार शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तसेच १.९८ लाख शेतकऱ्यांनी बॅंकेत जाऊन आधार क्रमांक आपापल्या बॅंक खात्याशी संलग्न केलेला नाही. त्यामुळे असे अडीच लाखांहून शेतकरी अजूनही लाभाच्या बाहेर आहेत.

PM Kisan
PM Kisan Scheme : पीएम किसानमधील अपात्र शेतकऱ्यांकडून ४१६ कोटी रुपये वसूल

स्वयंनोंदणीत पुणे, सांगली आघाडीवर

पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने घर बसल्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा दिली आहे. त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता १४ मेअखेर राज्यातील ३५.५१ लाख शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी पूर्ण केली. यात पुणे व सांगली या दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घरबसल्या गावशिवारातून पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र सार्वजनिक सुविधा केंद्रांची (सीएससी) मदत घेत नोंदणी केली आहे.

...असा तपासा हप्त्यांचा तपशील

‘पीएम किसान’च्या सर्व हप्तांचा तपशील ऑनलाइन तपासता येतो. त्यासाठी https://pmkisan.gov.in/ हे संकेतस्थळ शेतकऱ्याला मदत करते. तेथे लॉगइन होताच डाव्या बाजूला ‘बेनिफिशरी लिस्ट’ येथे क्लिक करावे. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपविभाग, गट आणि गाव निवडावे. त्यानंतर ‘गेट रिपोर्ट’वर क्लिक करताच लाभार्थ्यांच्या हप्त्यांचा तपशील अधिकृतपणे प्राप्त होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com