
Kolhapur News : कृषी सहायकांकडून ऑनलाइन योजनेच्या तपासणीची कामे ठप्प झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कृषी सहायक आपल्या विविध मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले आहे. त्याचा फटका कामकाजाला बसत आहे.
काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर कृषी सहायक सर्व शासकीय व्हॉटसअॅप ग्रुपमधून बाहेर पडले आहेत. या नंतर सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांकडून धरणे आंदोलन करण्यात आले.
कृषी सहायकांनी एक दिवस सामूहिक रजा आंदोलनही केले. ९ मेपासून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. अजूनही शासनातर्फे त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कृषी सहायकांनी दिला आहे.
सध्या अनेक कृषी सहायक कंत्राटी पद्धतीने काम करत असून, त्यांना कायमस्वरूपी सेवेची हमी हवी आहे. कृषी सहायकांचे पदनाम बदलून ‘सहायक कृषी अधिकारी’ करण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचे पदनाम बदलले गेले, परंतु कृषी सहायकांच्या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
ऑनलाइन कामकाजातील अडचणी
कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी वेगवेगळी ॲप वापरावी लागतात. शेतकऱ्यांचे बहुतांश काम ऑनलाइन करावे लागते. मोबाइलवर हा भार पेलणे कठीण असल्याने कृषी सहायकांना ऑनलाइन कम्प्युटर सेंटरवर स्वखर्चाने काम करावे लागते.
यामुळे शेतकऱ्यांचे काम रखडते आणि कृषी सहायकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. ग्रामस्तरावर ‘कृषी मदतनीस’ नेमण्याची मागणीही महत्त्वाची आहे. कृषी सहायकांना एकट्यालाच सर्व कामे करावी लागतात. एका कृषी सहायकाकडे चार ते पाच गावांची जबाबदारी असल्याने त्यांची दमछाक होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.