Turmeric Crop : हळद पिकांच्या नियोजनामुळे वाढले उत्पन्न

Turmeric Crop Management : पोखर्णी (जि. सांगली) येथील मनोज बाळकृष्ण पाटील यांच्याकडे गेल्या वीस वर्षापासून हळद हे पीक घेतले जाते. दरवर्षी साधारण दोन एकरावर हळद लागवड असते. त्यामुळे पिकाच्या व्यवस्थापनामध्ये ते कुशल झाले आहेत.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon
Published on
Updated on

Turmeric Cultivation : वाळवा तालुक्यातील पोखर्णी या गावामध्ये प्रामुख्याने ऊस पिकासह केळी, हळद ही पिके घेतली जातात. याच गावातील मनोज पाटील यांच्या वडिलांनी १० गुंठ्यांपासून हळद पिकाची सुरुवात केली. सुरवातीला पाटपाण्यावर हळद पिकवली जायची. त्यांच्याकडून या पिकातील बारकावे शिकत शिकत गेल्या दहा वर्षात मनोज त्यांनी क्षेत्र दोन एकरपर्यंत वाढवले. दरवर्षी दोन एकरावर सेलम जातीची हळद लागवड केली जाते. हे पीक फेरपालटीसाठीही उत्तम मानले जाते. बाजारपेठेतील हळदीची आवक लक्षात घेऊन हळद विक्रीचे नियोजन केले जाते. दोन वर्षापूर्वी हळदीला प्रति क्विंटल दहा हजार रुपये असा दर मिळाला होता. गतवर्षी हळदीला अपेक्षित दर मिळाले नसल्याने हळद ठेवली आहे. हळदीला सध्या हळदीचे दर वाढून २० हजारापर्यंत पोचले आहेत. एकूण अंदाज घेत हळद विक्रीचे धोरण ठरवत आहे.

Turmeric Farming
Turmeric Market: हळद बाजारातील तेजी पुढील काळातही टिकेल का? | Agrowon | ॲग्रोवन

शाश्वत पाण्यासाठी शिगाव येथील वारणा नदीतून साडेसात किलोमीटर अंतरावरून चार जणामध्ये एकत्रित पाइपलाइन केली आहे. यासाठी प्रत्येक २५ लाख इतका खर्च आला आहे. तेथून पाणी उचलून थेट विहिरीत सोडले आहे. त्या ठिकाणाहून शेतीला ठिबक सिंचनाची सोय केली आहे.

अशी केली जाते मशागत

  • ऊस गेल्यानंतर त्याचे पाचटाची कुट्टी करून घेतली जाते.

  • रोटाव्हेटर मारून ताग या हिरवळीच्या खतपिकाची लागवड केली जाते.

  • साधारण दीड महिन्यानंतर रोटाव्हेटर मारून ताग मातीमध्ये गाडला जातो.

  • त्यानंतर नांगरट करून एक महिना रान तापू दिले जाते.

  • महिन्यानंतर दुसरी नांगरट केली जाते.

  • सरी सोडून हळद लागवडीसाठी शेत तयार केले जाते.

Turmeric Farming
Turmeric Market: हळद लागवड यंदा कमी राहण्याचा अंदाज |Agrowon| ॲग्रोवन

हळद लागवडीचा कालावधी

  • अक्षयतृतीयेनंतर दहा दिवसानंतर लागवड सुरू केली जाते.

  • साडेचार फूट सरीचा वापर.

  • ३० इंचाचा बुंधा तयार केला जातो.

  • दोन गड्ड्यातील अंतर एक फूट असून झिगझॅग पद्धतीने लागवड

  • तापमान अधिक असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळला जातो.

  • .प्रामुख्याने घरचेच बियाणे वापरले जाते. त्यासाठी हळद काढणी झाल्यानंतर मातृगड्डे वेगळे काढले जातात. खराब झालेले मातृ कंद बाजूला काढतात. त्यानंतर उत्तम प्रतीचे बियाणे घरीच तयार केले जाते.

  • दर्जेदार मातृगड्डे पाल्याखाली सावलीला दोन महिने ठेवतात.

  • दीड महिन्यानंतर सुप्तावस्थेत हे गड्डे येतात. त्यावर पाणी मारले जाते. ते स्वच्छ करून लागवडी योग्य बेणे तयार होते.

  • त्यावर रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जाते.

आगामी महिनाभराचे नियोजन

  • आंतरमशागत, भांगलण आणि आळवणी

  • लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी भरणी केली जाते.

  • भरणी करतेवेळी करंज पेंड, निंबोळी पेंड, डीएपी आणि पोटॅश अशा खतांचा वापर केला जातो.

  • एकरी खर्च : ७० ते ८० हजार रु.

  • एकरी उत्पादन ३० क्विंटल ते ३५ क्विंटल निश्चित ठेवले

  • हळदीला मिळणारा दर सरासरी १० हजार रुपये प्रति क्विंटल असा

  • असतो.

मनोज पाटील, ९०११०१८०२७

(शब्दांकन ः अभिजित डाके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com