Washim News : रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक तसेच परिसरातील विविध गावांमध्ये हळदीची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. यावर्षी कमी पाऊस झाल्याचा फटका पिकाला बसण्याची शक्यता दिसून येत आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.
रिसोड तालुक्यात लोणी बुद्रूक, लोणी खुर्द, आसोला, मोप, कण्हेरी, आसोला, भर, मोरगव्हाण आदी गावांमध्ये मसाला पीक म्हणून ओळख असलेल्या हळदीची लागवड केली जाते. क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. या भागात हळदीची उत्पादकताही चांगली आहे.
यावर्षी रिसोड तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने विविध पिकांसह हळदीला फटका बसण्याची शक्यता आहे. कमी पावसाच्या वर्षातही एकीकडे लागवड वाढलेली आहे. यावर्षी हळदीला भाव चांगला असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापनावर जोर दिला.
योग्य खत, पाणी, फवारणीचे नियोजन केले. आता अचानक पाणी पातळी कमी झाल्याने पिकासाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले. पाण्याचा ताण पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाण्याच्या ताण पडल्याने वेळेपूर्वीच हळदीचे पीक करपून जात आहे. या परिसरात २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. हे सर्व पीक पाण्याअभावी अडचणीत आलेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.