Agrowon Podcast : तुरीचे भाव टिकून; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत तूर दर

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : सोयाबीन नरमले

सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी ३ हजार ९०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान सुरु आहे.

सोयाबीन बाजाराने यंदा शेतकऱ्यांना पुरते निराश केले आह. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आज सोयाबीन ९.९२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Pomegranate Price : डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा

कापूस स्थिर

कापसाचे भाव बाजारात स्थिर दिसले. यंदा देशातील उत्पादनात घट येण्याची शक्यता सरकारसही सर्वच संस्थांनी व्यक्त केली. पण सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. बाजारातील आवकही चांगली आहे.

रोज जवळपास १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. तर देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तूर टिकून

देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे. देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली. पण ही आवक अगदीच किंचित आहे. आवकेचा दबाव वाढायला आणखी महिना ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे सध्या दरात चढ उतार सुरु आहेत.

सध्या बाजारात तुरीला सरासरी ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. तुरीच्या भावातील चढ उतार कायम राहतील. मात्र नव्या मालाची बाजारात आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावर दबाव वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Soybean Market : सोयाबीन खरेदीला चांदवड येथे प्रारंभ

ज्वारी दबावातच

राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला हमीभावापेक्षा किमान २० टक्यांपर्यंत कमी भाव मिळत आहे. खरिपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव आला आहे.

सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. यंदा रब्बी ज्वारीचाही पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा दबाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे.

हरभरा स्थिरावला

हरभरा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. हरभऱ्याच्या भावातील तेजी कमी झाल्यानंतर आवक आणि भाव स्थिर दिसत आहेत. यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र हरभरा पीक वाढीच्या आणि काढणीच्या काळात हवामान कसे राहते? यावरही पीक अवलंबून असेल. यंदा देशात उष्णता अधिक राहण्याची शक्यता आहे. सध्या देशातील बाजारात हरभरा भाव ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभरा बाजारात नवा माल दाखल होईपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com