Tur Crop In Crisis : धुक्यामुळे तुरीचे पीक धोक्यात

Foggy Weather : यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेले तुरीचे पीकही आता अवकाळी पाऊस, धुक्याच्या वातावरणामुळे अडचणीत सापडले आहे.
Tur Crop
Tur CropAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या खरीप हंगामात लागवड केलेले तुरीचे पीकही आता अवकाळी पाऊस, धुक्याच्या वातावरणामुळे अडचणीत सापडले आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पाऊस होत आहे. त्यामुळे शेतांमध्ये उभे असलेले तुरीचे पीक जमिनीवर लोळले. तर, वेचणीला आलेला कापूस ओला झाल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

या अवकाळी पावसामुळे आधीचा तुरीचा फुलोरा अनेक ठिकाणी गळून पडला. तुरीच्या झाडावर लागलेल्या शेंगाही तूटून पडल्या. वादळी वारा व पावसाने तूर कोसळली आहे. हा सर्व प्रकार तुरीच्या पिकासाठी मारक मानला जात आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Tur Crop
Crop Damage : शेतीपीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत

आता गेल्या तीन दिवसांत सातत्याने पावसाचे वातावरण बनलेले असून रात्री पाऊस व दिवसा धुके पडलेले राहते. पहाटेपासून शेतशिवारात धुके पडत आहे. दुपारपर्यंत हे वातावरण कायम असते. सतत ढगाळ वातावरण तयार झाल्याने तुरीला आलेला फुलोर व शेंगांवर कीडरोगांचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Tur Crop
Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील उडी येथील रणजित घुगे यांच्या शेतातील तूर पिकाची दोन दिवसांतील वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाले. परिपक्व झालेल्या शेंगा आटोआप फुटल्या आहेत. यातून काय पीक हातात लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरिपातील सोयाबीनचा पाऊस नसल्याने बोजवारा झाला होता.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हिसकावून नेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतामधील तुरीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. कापूससुद्धा खाली पडून मातीत मिसळत आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
- मनोहर थारकर, शेतकरी, मुंडगाव, जि. अकोला
कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत १० अंशांनी घट झाली आहे. अचानक घटलेल्या तापमानामुळे व धुक्यामुळे तुरीच्या फुलांची गळ होऊ शकते. तसेच पानातील पाणी गोठल्यामुळे पाने करपू शकतात. त्याच्या नियंत्रणासाठी काडी कुटार पेटवून धूर करावा. जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी विहिरीचे किंवा बोअरवेलच्या पाण्याचे ओलीत द्यावे. पावसाचा अंदाज पाहूनच व उघडीप मिळाल्यास बुरशीनाशक व कीडनाशकांची फवारणी करावी.
- डॉ. विनोद खडसे, कृषी विस्तार विद्यावेत्ता, प्रशिक्षण व भेट योजना, कृषी महाविद्यालय, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com