Crop Protection Training : कृषी अधिकाऱ्यांचे पीक संरक्षणाविषयी होणार प्रशिक्षण

Agriculture Officers Training : महिनाअखेर मराठवाड्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची पीक संरक्षण विषयक प्रशिक्षण घेण्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृह शुक्रवारी (ता. १४) पार पडलेल्या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून गत हंगामात आलेल्या २७ प्रत्याभरण समस्या शास्त्रज्ञान समोर मांडल्या. महिनाअखेर मराठवाड्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांची पीक संरक्षण विषयक प्रशिक्षण घेण्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

प्रत्याभरण संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रमुखांनी व संबंधित विषयाच्या तज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रश्नांना अनुसरून पोहोचवायची शास्त्रोक्त सल्लारुपी माहिती दिली. या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी होते. शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न शंकी गोगलगाय आक्रमण त्यावर उपाय योजनेसाठी शास्त्रज्ञ प्रत्येक वेळी उपलब्ध राहतील.

Dr. Indra Mani
Agriculture Training : कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती प्रशिक्षण

याशिवाय तुरीच्या सत्यता दर्शक व ब्रिडर सीडचा पुरवठा महाबीज कृषी विज्ञान केंद्र शेतकरी उत्पादक कंपन्या आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक संरक्षणाच्या अनुषंगाने या महिना अखेरपर्यंत कृषी विद्यापीठात मराठवाड्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले. तूर अधिक मधुमका एकास दोन प्रमाणात आंतरपीक घ्यावे.

सोयाबीन मध्ये जोडओळ पद्धतीने लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. त्याचवेळी अकोला येथे पार पडलेल्या जॉईंट ॲग्रेस्कोमधील शिफारसींचा उलगडा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांसमोर करण्यात आला. बैठकीत बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा तुरीच्या वाणाच्या संशोधनासाठी सत्कार करण्यात आला.

Dr. Indra Mani
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक

कृषी विभागाने या विषयी मागितले मार्गदर्शन

शंखी गोगलगाय, शेडनेटमधील पीक आणि फळ पिकात वाढते आक्रमण

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक

मल्चिंगवरील मिरची लागवडीतील मर रोगाचा प्रादुर्भाव

नव पिकांबाबत हवे शास्त्रोक्त मार्गदर्शन

आंबा, मोसंबीतील लागवड अंतराबाबतची शिफारस

सुरती हुरडा टिकवण्याची पद्धत

एस. आर. टी. पद्धतीवर संशोधन

डाळिंबावरील पिन होल बोरर कीड नियंत्रण

तेल्या नियंत्रणाबाबत हवे नवतंत्रज्ञान

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी उपाय

अतिघन कापूस लागवड, सेंद्रिय कापूस लागवड याबाबत हवे तंत्रज्ञान

पेरणी यंत्रातून खत योग्य प्रमाणात पडण्यासाठी पेरणी यंत्रामध्ये सुधारणा

राजमा पिकाचे लागवड तंत्रज्ञान

गळीत धान्य पिकांच्या विकसित नवीन वाणाबाबत

प्रात्यक्षिकांसाठी दहा वर्षांच्या आतील बियाण्याची अत्यंत कमी असलेली उपलब्धता

सूक्ष्म अन्नद्रव्य वापराच्या योग्य शिफारशी

माती परीक्षण अहवालानुसार सोयाबीन उत्पादन वाढीसाठीची सूत्रे निर्गमित करावी

ग्रेड-1 खताचे वापराबाबत शिफारशी

सर्व कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यांची नियमितपणे बैठकी आयोजित केल्या जावी. केवळ संशोधन किंवा आपल्याकडील जबाबदारी पुरते मर्यादित न राहता विद्यापीठांतर्गत तसेच कृषी विभागातील सर्वांनी मिळून जास्तीत जास्त विस्तार कार्य करावे.
इंद्र मणी, कुलगुरू वनामकृवी, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com