Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला
Solapur News : तापमान वाढीचा फटका डाळिंब बागांना बसू लागला आहे. झाडाला लगडलेली डाळिंबे उन्हाच्या चटक्याने खराब होऊ लागली आहेत. या फळांना कागदाने झाकण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पण यासाठी आवश्यक असणाऱ्या कुशल कामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
परंतु बाहेरून मजूर आणून परवडत नसल्याने यावर उपाय म्हणून डाळिंब उत्पादकांनी स्थानिक मजुरांना डाळिंब फळावर पेपर लावणीचे प्रशिक्षण दिले आणि आता या प्रशिक्षित महिला कामगारांमुळे शेतकऱ्याच्या खर्चाची व वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.
फळबागा जगण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष आहेच, त्यातच भर म्हणून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे पारा कमालीचा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे डाळिंब फळावर सनबर्निंग होणे, चट्टा येणे, फळाची चमक कमी होणे, फळाचा रंग धुरकट होणे आधी समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून रद्दीत मिळणारा पेपर स्टेपलर पिनद्वारे फळाभोवती गुंडाळला जातो.
बाहेरून येणाऱ्या मजुरांकडून अडवणूक करून जास्त मजुरी घेतली जाते. शिवाय मजुरांच्या ‘वेटिंग’चाही सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी कैलास काटकर व त्यांच्या पत्नी राधिका काटकर यांनी येथील स्थानिक महिला कामगारांना पेपर लावणीचे प्रशिक्षण दिले.
मागील वर्षी त्यांनी स्वतःच्या डाळिंब बागेत हा प्रयोग यशस्वी केला. या प्रशिक्षणाच्या जोरावर या वर्षी या कुशल महिला कामगारांनी अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागातील फळे पेपरने झाकून घेतली. याच भागात ‘स्किल्ड लेबर’ तयार झाल्याने डाळिंब उत्पादकांच्या खर्चात मोठी बचत होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.