Nanded Rain : पुरात वाहून गेल्याने माय-लेकीसह पुतणीचा मृत्यू

Nanded Flood News : नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने मागील आठ दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीचे कामे ठप्प झाली आहेत.
Flood
Flood Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) मॉन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सात मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाचा कहर झालेल्या नदी-नाल्यांना पूर येऊन वरवट (ता. हदगाव) येथे माय-लेकीसह पुतणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नांदेड जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने मागील आठ दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीचे कामे ठप्प झाली आहेत. पावसाचा कहर अधिक असल्याने अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला आहे.

Flood
Monsoon Progress: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मॉन्सूनची प्रगती

याच काळात मनाठा मंडळातील वरवट (ता. हदगांव) परिसरात मंगळवारी दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे वरवटकडून शिबदरा गावाकडे जाणाऱ्या नाल्याला पुर आला.

या पुरात वरवट येथील शेतमजूर महिला अरुणा बळवंत शक्करगे (वय ३७), त्यांची मुलगी दुर्गा बळवंत शक्करगे (वय १०) व पुतणी समीक्षा विजय शक्करगे (वय ७) शेताकडून गावाकडे येत असताना वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Flood
Monsoon 2025: राज्यात १०६ टक्के पाऊस पडणार तर मराठवाड्यात यंदा जास्त पावसाचा अंदाज

या घटनेची माहिती मिळताच हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे, मनाठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत तिंघीवर बुधवारी वरवट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगळवारी (ता. २७) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस झाला. हा पाऊस हदगाव, किनवट, कंधार, देगलूर, बिलोली, भोकर, उमरी, धर्माबाद या तालुक्यात सर्वाधीक होता. यामुळे जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी झाली. यात जाहूर ७५.३०, तळणी ६६.८०, निवघा ६६.८०, पिंपरखेड ६६.८०, गोळेगाव ६६, जलधारा ६५.५०, येवती ६५.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com