Khair Tree : खैराच्या लाकडाची वाहतूक करताना तस्करांना अटक

Traffickers Arrested : खैर झाडांची बेकायदा तोड करून वाहनांमध्ये भरणा करत असताना दोन तस्करांसह खैर नग ९ व टेम्पो असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
Smuggler
SmugglerAgrowon

Nashik News : पेठ तालुक्यात वनविकास महामंडळाच्या राखीव वनक्षेत्रात मंगळवारी (ता. २६) फिरते पथक पेठमधील वनाधिकारी वनसंरक्षणाची कामे करत होते. त्या वेळी कक्ष क्रमांक ९४ बोरथडीची माळ सावरणा बीटमधून काही तस्कर खैर झाडांची बेकायदा तोड करून वाहनाने वाहतूक गुजरातमध्ये करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर सापळा रचून खैर झाडांची बेकायदा तोड करून वाहनांमध्ये भरणा करत असताना दोन तस्करांसह खैर नग ९ व टेम्पो असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर अटक केलेल्या २ आरोपींना नाशिक जिल्हा न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

Smuggler
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांविरुद्ध दाखल गंभीर गुन्हे परत घ्या

जिल्ह्यात वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने पेठ, त्र्यंबकेश्वर व सुरगाणा या तालुक्यांत महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमांलगत राखीव वन क्षेत्रात खैर प्रजाती झाडांचे महामंडळाचे रोपवन आहे.

Smuggler
Sugarcane Cultivation : बेणे प्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी

या क्षेत्रात कायम गुजरात राज्यातून अनेक तस्कर खैर वृक्षतोड करून वाहतूक करताना आढळतात. या तस्करांना आळा बसावा याकरिता वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र वनसंरक्षणाचे काम करतात.

त्या वेळी ही करवाई करण्यात आली. आरोपींना अटक केल्यानंतर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६(१) ड, ई, एफ,५२(१),४१(१)(२) नुसार वन गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली.

त्या वेळी अटक केलेले आरोपी मधुकर चंदर जोगारे (रा. बोरदा, ता. पेठ) व विवेक आनंदा धनगर (रा. खिर्डी, ता. सुरगाणा) यांना अटक केली. तर पुष्पराज गहले, नवसु लोहार, विष्णू राऊत, एकनाथ तुंबडे हे फरारी असून त्यांचा शोध वनाधिकारी घेत आहेत.

नाशिक वन प्रकल्प विभागातील फिरते पथक पेठचे वनपरीक्षेत्र अधिकारी रमेश बलैया, वनपाल योगेश धनगर, वनरक्षक मंगेश वाघ, कुंदन राठोड, दीपक डफड, डी. यू. शिंगटे, पोलीस शिपाई बहीराम, वाहन चालक डी. पी. बोंबले आदी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com