Sugarcane Cultivation : बेणे प्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी

Arun Gote : ‘‘उत्पादन वाढीसाठी बेणे प्रक्रिया करूनच ऊस लागवड करावी,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गोटे यांनी दिला.
Arun Gote
Arun GoteAgrowon

Latur News : ‘‘उत्पादन वाढीसाठी बेणे प्रक्रिया करूनच ऊस लागवड करावी,’’ असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. अरुण गोटे यांनी दिला.

ॲग्रोवन आणि शेतकरी सेवा केंद्र चाकूर यांच्या वतीने चाकूर तालुक्यातील सांडोळ येथे ऊस व्यवस्थापन याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गुट्टे बोलत होते.

Arun Gote
Sugarcane Production: ज्यूट पॅकिंगची माहिती ऑनलाइन भरावी

चर्चासत्राला प्रगतिशील शेतकरी गणपत मुंडे, नागनाथ कवठे, शेतकरी कृषी सेवा केंद्राचे महेश मर्डे, उपसरपंच नेताजी कवठे उपस्थित होते. डॉ. गुट्टे म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना निरोगी बेणे निवडावे. वेणे प्रक्रिया करूनच लागवड करावी. उसाच्या अधिक उत्पादनासाठी फुटव्यांची संख्या एकरी ४० हजार असावी.

उसाला माती लावणे आवश्यक आहे. खते शिफारसी प्रमाणे द्यावीत. तन नाशकाचा वापर लागवडीनंतर चार आठवड्याने करावा. योग्य व्यवस्थापन आणि उसाचे चांगले उत्पादन मिळेल. दुष्काळी परिस्थितीत उसाचे पाचट ठेवावे. पाचटाचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी चांगला फायदा होतो.

Arun Gote
Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली, पहिली उचल ३१७५

दोन पाणी पाळ्यामधील अंतर टप्प्याटप्प्याने वाढवावे. कृषी विभागाच्या वतीने व्ही. जे. व्यंजने यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. महेश भरडे यांनी शेतीमध्ये लागणाऱ्या औषधांचा व खतांचा वापर शिफारसी प्रमाणे करण्याचे आवाहन केले.

यावेळी रामेश्वर पताळे विजयकुमार ऊसतुरगे, रामेश्वर मोरगे, माधव चिंचोळे, अनिल भारकाडे, प्रल्हाद चिंचोळे, विठ्ठल जाधव, काशिनाथ कवठाळे, भास्कर मुंडे आदी उपस्थित होते ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी बालाजी थोडेसरे यांनी सूत्रसंचालन करूनआभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com