Palkhi Traffic Route : पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

Palkhi Sohala 2024 : ९ जुलै ते १८ जुलै या कालावधीत अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
Palkhi Sohala 2024
Palkhi Sohala 2024 Agrowon

Solapur News : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा ११ जुलै रोजी नातेपुते आणि संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी १२ जुलै रोजी अकलूज हद्दीत प्रवेश करणार आहे. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होणार असल्याने वारकरी हे पायी पंढरपूरकडे येत असतात.

पालखी बरोबर त्यांच्या दिंड्या व वाहने ही सोबत असतात, त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी ९ जुलै ते १८ जुलै या कालावधीत अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

Palkhi Sohala 2024
Palkhi Sohala 2024 : आळंदी रथाची, मानाच्या बैलांची चाचणी

जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी यासंबंधीचे आदेश पारीत केले आहेत. पंढरपूरकडून पुणे येथे जाणारे वाहने वाखरी-साळमुख फाटा-पिलीव-म्हसवड-फलटण किंवा पंढरपूर-टेंभुर्णी पर्यायी मार्गाने पुणेकडे जातील.

Palkhi Sohala 2024
Palakhi Sohala 2024 : वारकऱ्यांनी आळंदी गजबजली

पुणे-फलटण येथून पंढरपूरकडे येणारी वाहने फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपूर अथवा पुणे-टेभुर्णी मार्गे पंढरपूरकडे येतील. वेळापूर येथून पंढरपूरकडे येणारी वाहने साळमुख चौक-सातारा रोड या पर्यायी मार्गाने पंढरपूरकडे येतील. सांगोला येथून पुणेकडे जाणारी वाहने (सांगोला येथून पुणेकडे जाणारी जड वाहतूक वगळून - सांगोला-साळमुख चौक वेळापूर-अकलूज-इंदापूर) या पर्यायी मार्गाने जातील.

पुणे येथून इंदापूर मार्ग पंढरपूर येथे येणारी वाहने टेंभुर्णी-पंढरपूर पर्यायी मार्गानी येतील. अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणारी वाहने अकलूज-टेभुर्णी या पर्यायी मार्गाने जातील. सोलापूर येथून पंढरपूरमार्गे अकलूजकडे जाणारी वाहने सोलापूर-टेंभुर्णी-अकलूज या पर्यायी मार्गाने जातील, असेही त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com