Pandharpur Maghi Yatra : माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात वाहतूक बदल

Changes in Traffic Routes : पंढरपुरात २० फेब्रुवारी रोजी माघी यात्रा होणार आहे. यात्रा १४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे,
Pandharpur Yatra
Pandharpur YatraAgrowon

Pandharpur News : पंढरपुरात २० फेब्रुवारी रोजी माघी यात्रा होणार आहे. यात्रा १४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहराबाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

हा बदल १६ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत.

पंढरपुरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना

पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूरकडे जाणारी सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका मार्गे जातील.

पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाटापासून मार्गस्थ होतील.

Pandharpur Yatra
Pandharpur Maghi Vari : पंढरपुरातील विषबाधित वारकऱ्यांची प्रकृती स्थिर

पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत

१६ ते २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार चौक ते शिवाजी चौक, सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरून तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात थांबतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेसना जुना दगडी पूल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कॉर्नर ते नगरपालिका हा मार्ग पासेसच्या वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Pandharpur Yatra
Maghi Vari : ‘माझा भाव तुझे चरणी, तुझे रुप माझे नयनी’

पंढरपूर शहरात येणाऱ्या वाहनांना सूचना

पंढरपुरात यात्रेनिमित्त अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्यादेवी चौक, शेटफळ चौक मार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्क करावीत. तसेच ६५ एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथील मैदानात पार्क करावीत.

कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येऊन वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळीमार्गे बायपास मार्गे वेअर हाउस व यमाई तुकाई मंदिर व बिडारी बंगला येथे वाहनतळ करावीत.

वाहनतळ व्यवस्था अशी असेल...

अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने अहिल्या चौक तीन रस्ता मार्गे विसावा व ६५ एकर येथील नगरपालिकेच्या वाहनतळावर वाहने लावतील. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाउस येथे पार्क करावीत.

कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे येऊन टाकळी वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाउस येथे वाहने लावावीत. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com