Millet Year 2023 : तृणधान्यांपासून पारंपरिक पदार्थांची स्पर्धा

Millet Crop : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मोसा (ता. मंठा) येथे पौष्टिक तृणधान्य पारंपरिक पदार्थ स्पर्धेचे आयोजन नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
Millet Foods
Millet FoodsAgrowon

Jalna News : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मोसा (ता. मंठा) येथे पौष्टिक तृणधान्य पारंपरिक पदार्थ स्पर्धेचे आयोजन नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात एकूण २६ महिलांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी सरपंच विष्णू आढे होते. तर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विभागाचे प्रमुख प्रा. अजय मिटकरी, अन्नतंत्र विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पाटील, गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख एस. एन. कऱ्हाळे, तसेच मोसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्यद्यापिका छाया डहाळे व त्यांच्या सहकारी ममता नाइनवाड यांचीही उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

Millet Foods
Millet Rate : यंदा बाजरीला दर मिळण्याची शक्यता, पावसाने उत्पादन घटले

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी कथन करून दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विषद केले. शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, रागी, भगर, राळा, कोद्रा, शामुल, राजगिरा यासारख्या पौष्टिक तृणधान्याची लागवड करावी, त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करेल, असे ते म्हणाले.

Millet Foods
Kodo Millet : कोडो मिलेटचे आरोग्यवर्धक पदार्थ

या स्पर्धेत गावातील महिलांनी पौष्टिक तृणधान्यापासून विविध पदार्थ तयार केले. यामध्ये राळा, गोड पुरी, राजगिरा धीरडे, भागरीची खीर, बाजरीच्या पुऱ्या, भगर पालक पुरी, ज्वारी तिरंगा उत्तपा, कोंडुळे, पराठे, थालीपीठ, अप्पे आदी पदार्थ बनविले.

मोसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका डहाळे, गावचे सरपंच विष्णू आढे व केविकेच्या गृहविज्ञान तज्ज्ञ संगीता कऱ्हाळे यांच्या समितीद्वारे पदार्थांचे मूल्यांकन करण्यात आले.

सर्व दृष्टीने उत्कृष्ट पदार्थांसाठी ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे वितरित करण्यात आली.

बक्षीसपात्र महिलांची नावे (कंसात क्रमांक),

शीतल केदार मातणे (प्रथम), स्वाती उमेश मातणे (द्वितीय), अश्विनी नामदेव मातणे (तृतीय), मीरा संतोष मातणे (चौथा) व रेखा संपत मातणे (पाचवा).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com