Orange Rate : दर गडगडल्याने व्यापारी संत्रा बागांत फिरकेना

Market Update : बाजारात संत्र्याचा दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी केलेले सौदे सोडले आहेत. आता हे व्यापारी अत्यंत कमी दराने संत्र्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
Orange Orchard
Orange OrchardAgrowon

Akola News : भरमसाट निर्यातशुल्क व इतर राज्यातील संत्रा बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्याने या भागातील संत्रा उत्पादकांना धडकी भरली आहे. बाजारात संत्र्याचा दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी केलेले सौदे सोडले आहेत. आता हे व्यापारी अत्यंत कमी दराने संत्र्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

या हंगामातील बहर शेतकऱ्यांनी जुलै, ऑगस्ट महिन्यात विक्री केला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनी निश्चित केलेले दर आता माल तोडणीला आलेला असताना द्यायला तयार नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी बागांचे सौदे सोडून दिले असून अॅडव्हान्स परत मागत आहेत. काही शेतकऱ्यांच्या बागांचा जुलैमध्ये साधारणपणे ७०० ते ९०० रुपये प्रतिक्रेट दराने सौदा झाला होता. सध्या हे व्यापारी दर घसरल्याचे कारण देत ३०० ते ३५० रुपये क्रेटने संत्रा मागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Orange Orchard
Orange Processing : मोसंबीपासून जॅम, जेली, मार्मालेड, स्क्वॅश

संत्र्याची काढणी सुरू झाल्यानंतर उच्चतम दर्जाच्या फळांना ५० ते ६० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर होता. या फळांचा दर आज ३० ते ४० रुपयांपर्यंत घसरला. बागांमध्ये दुय्यम प्रतीची फळे सर्वाधिक निघतात. या दुय्यम फळांचा दर अवघा १५ ते २० रुपयांपर्यंत आहे.

संत्र्याची काढणी सुरू झाल्यानंतर उच्चतम दर्जाच्या फळांना ५० ते ६० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर होता. या फळांचा दर आज ३० ते ४० रुपयांपर्यंत घसरला. बागांमध्ये दुय्यम प्रतीची फळे सर्वाधिक निघतात. या दुय्यम फळांचा दर अवघा १५ ते २० रुपयांपर्यंत आहे.

Orange Orchard
Orange Crop Management : नैसर्गिक पद्धतीने हळद, संत्रा पीक नियोजन कार्यशाळा

इतक्या कमी दरामुळे संत्रा उत्पादकांचे नुकसान होत आहे. बांगलादेशात होणारी निर्यात बंद असल्याचा फटका यंदा शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. त्या देशाने आयातशुल्कात केलेली भरमसाट वाढ ही विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी अडचणीची झाली.

स्थानिक बाजारपेठांमध्ये उठाव कमी असल्याचे कारण व्यापारी देत आहेत. या आठवड्यात दोन ते तीन दिवस सलग पावसाचे वातावरण बनले. त्यामुले संत्रा बागायदरांची झोप उडाली. तोडणीला आलेल्या बागांचे वादळाने बऱ्याच ठिकाणी मोठे नुकसानही केले. व्यापाऱ्यांनी संत्र्याचे दर आणखीच दबावात ठेवले आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे...

निर्यातबंद, व्यापाऱ्यांनी मोडलेले सौदे, पडलेले दर अन वादळाचा तडाखा

जुलै, ऑगस्टमध्ये सौद्यात ठरल्यानुसार व्यापारी आता दर देईनात

व्यापारी दिलेली आगाऊ रक्कमही परत मागू लागले

आधी ९०० रुपयांना ठरलेल्या क्रेटची ३०० रुपयांनी मागणी

बांगलादेशातील निर्यात बंद असल्याचा आधीच शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

अवकाळी, गारपीठ, वादळाचा तडाखा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com