Tractor Market Sell: ट्रॅक्टर विक्रीत मे महिन्यात ५ टक्क्यांची वाढ

Tractor Update : देशात यंदा रबी हंगाम चांगला राहिल्याने ट्रॅक्टरची विक्री वाढत आहे. मे महिन्यात ट्रॅक्टर विक्री एप्रिलच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली.
Tractor Market Sell
Tractor Market SellAgrowon
Published on
Updated on

Tractor News : देशात यंदा रबी हंगाम चांगला राहिल्याने ट्रॅक्टरची विक्री वाढत आहे. मे महिन्यात ट्रॅक्टर विक्री एप्रिलच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली. मे महिन्यात एकूण ८३ हजार २६७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली, असे ट्रॅक्टर आणि यांत्रिकिकरण असोसिएशनने म्हटले आहे.

देशातील बाजारात ट्रॅक्टर विक्री मे महिन्यात वाढली आहे. मे महिन्यात देशातील ट्रॅक्टर विक्री २ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. देशात या महिन्यात ८३ हजार २६७ ट्रॅक्टरची विक्री झाली. ही विक्री एप्रिल महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांनी अधिक होती. एप्रिल २०२३ मध्ये देशात एकूण ७९ हाजर २८८ ट्रॅक्टर विकले गेले, असे ट्रॅक्टर आणि यांत्रिकिकरण असोसिएशनने म्हटले आहे.

ट्रॅक्टर उद्योगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात यंदा रबी हंगाम चांगला साधला. हंगाम साधल्यामुळेच शेतकऱ्यांची ट्रॅक्टरला मागणी वाढली आहे. मे महिन्यात ट्रॅक्टर विक्रीत विशेष वाढ झाली होती. यामुळे ट्रॅक्टर उद्योगालाही दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून ट्रॅक्टर विक्रीत लक्षणीय वाढ दिसत नव्हती. मात्र रब्बी हंगामानंतर ट्रॅक्टर विक्री चांगलीच वाढली आहे.

इस्काॅर्ट कुबोटाच्या ट्रॅक्टर विक्रीत मे महिन्यात १३.५ टक्के वाढ झाली आहे. कुबोटाने मे महिन्यात ८ हजार ७०४ ट्रॅक्टर्सची विक्री केली. आर्थिक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद कायम आहे. त्यामुळे देशातील सर्वच भागांमध्ये ट्रॅक्टर विक्री चांगली झाली, असे कुबोटा कंपनीच्या वतीन सांगण्यात आले. 

Tractor Market Sell
Tractor Engine Service : ट्रॅक्टर इंजिनची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टी टाळाल?

महिन्द्रा आणि महिन्द्राच्या विक्रीत ३ टक्क्यांची वाढ झाली होती. महिन्द्राने देशातील बाजारात ३३ हजार ११३ ट्रॅक्टरची विक्री केली. ट्रॅक्टरची मागणी पुढील काळातही कायम राहील, असा विश्वास महिन्द्रा कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला. एकूणच ट्रॅक्टर उद्योगाला पुढील काळातही ट्रॅक्टरची विक्री सकारात्मक राहण्याची आशा आहे.

हवामान विभागाने यंदा देशात सरासरी पाऊसमान व्यक्त केले. जलाशयांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच देशातील आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडत आहेत. शेतकऱ्यांना खरेदीसाठी पतपुरवठाही होत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगाला चांगल्या व्यवसायाची आशा आहे.

उत्पादन कमी राहिले

मे महिन्यात ट्रॅक्टरची विक्री जास्त झाली. मात्र ट्रॅक्टर उत्पादन ७९ हजार ९२८ युनिट झाले होते. २०२२ च्या मे महिन्यातील ट्रॅक्टरचे उत्पादन १ लाख ३ हजार ५६३ युनिट झाले होते. 

निर्यातही वाढली

मे महिन्यात केवळ देशातील बाजारात ट्रॅक्टरची विक्री वाढली नाही तर निर्यातीतही वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील ट्रॅक्टर निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पण मे २०२२ चा विचार करता यंदाची निर्यात २८ टक्क्यांनी कमी झाली. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात ११ हजार ५८२ ट्रॅक्टरची निर्यात झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com