Hunger Strike : सोयाबीनच्या दरासाठी औशात ट्रॅक्टर रॅली

Soybean Rate Issue : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील १८ सप्टेंबरपासून औशाच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Tractor Rally
Tractor RallyAgrowon
Published on
Updated on

Latur News : सोयाबीनला साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील १८ सप्टेंबरपासून औशाच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत सोमवारी (ता. २३) तालुक्यातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फेरी काढली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा ढीग रचून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. याच विषयावर बुधवारी (ता. २५) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Tractor Rally
Madhya Pradesh Soybean Farmers' Protest : मध्य प्रदेशात १ ऑक्टोबरला चक्का जाम आंदोलन; टिकैत यांचा सहभागी न होण्याचा निर्णय

दरम्यान, घाडगे पाटील यांच्या आंदोलनाला शेतकरी व विविध संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी किल्ला मैदान ते तहसील कार्यालयादरम्यान काढलेल्या ट्रॅक्टर फेरीत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Tractor Rally
Paddy and Soybean : हरियाणात धान आणि मध्य प्रदेशमध्ये सोयबीन खरेदीची तारीख बदलली

सकाळी आमदार अभिमन्यू पवार यांनी घाडगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचा शब्द दिला. दोन दिवसांपूर्वी आमदार धीरज देशमुख यांनीही घाडगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा देत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली होती.

घाडगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार दिनकर माने यांनी बुधवारी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com