Dr. Venkat Mayande : ‘ॲग्रिकल्चर ४.०’ क्रांतीच्या दिशेने...

Article by Dr. Venkat Mayande : २००७ मध्ये मी अकोला इथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झालो व या दैनिकाचा नियमित वाचक झालो.
डॉ. व्यंकट मायंदे
डॉ. व्यंकट मायंदे Agrowon
Published on
Updated on

डॉ. व्यंकट मायंदे

Agriculture Advice : ‘ॲग्रोवन’चा जन्म झाला त्या वेळी मी हैदराबादच्या केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होतो. त्या वेळी माझे मराठी वृत्तपत्रांचे वाचन फारसे नव्हते. मी २००६ मध्ये महाराष्ट्र व अविभाजित आंध्र प्रदेश या राज्यांतील ५५ कृषी विज्ञान केंद्राचा विभागीय समन्वयक म्हणून रुजू झालो. त्या निमित्ताने माझा महाराष्ट्रभर प्रवास सुरू झाला.

या काळात माझे ॲग्रोवन दैनिकाचे वाचन सुरू झाले. पुढे लवकरच जुलै २००७ मध्ये मी अकोला इथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झालो व या दैनिकाचा नियमित वाचक झालो. तेव्हापासून आजतागायत माझी सकाळ सुरू होते ती या दैनिकाच्या वाचनाने. कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात या दैनिकाचा फार मोठा वाटा आहे.

डॉ. व्यंकट मायंदे
Rabi Crop Loan : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत रब्बी कर्जपुरवठा सहा टक्क्यांवर

ॲग्रोवनच्या कंटेंट व थीममध्ये काळानुरूप अनेक सकारात्मक बदल झाले. बातम्यांमध्ये विविधता आली. स्थानिक यशोगाथा व घडामोडींना विभागीय आवृत्तीत स्थान मिळाले. परिणामी, वाचक वर्ग अनेक पटींनी वाढला. या दैनिकाच्या वाचकवर्गात आता केवळ शेतकरीच नव्हे तर कृषितज्ज्ञ, अधिकारी, शेती विषयात आवड असलेले नागरिक व राजकीय नेते आहेत. या दैनिकातील वार्तांकन व लेखांची विश्‍वासार्हता मोठी आहे. या दैनिकातील अग्रलेखांची व बातम्यांची शासनाला अनेकदा दखल घ्यावी लागते.

पुढील दशक आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. जगातील शेती ‘ॲग्रिकल्चर ४.०’च्या दिशेने म्हणजे चौथ्या कृषितंत्रज्ञान क्रांतीकडे वाटचाल करीत आहे. शेतीवरील हवामान बदलाचे परिणाम, बिघडलेले अर्थशास्त्र व तरुण पिढीतील नैराश्य हे घटक आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यांचा सामाजिक व आर्थिक अंगांनी वेध घेण्याचे काम या वृत्तपत्राला पार पाडावे लागणार आहे. तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन प्रबोधन करावे लागणार आहे.

डॉ. व्यंकट मायंदे
Agriculture Development : शेती आणि ग्रामविकासाचे व्यासपीठ

लहान शेतकऱ्यांना संघटित करून गटशेतीला प्रवृत केले तर शेती फायद्याची होऊ शकते. तसेच कृषी क्षेत्रात स्टार्टअप उद्योगांना सक्षम करून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. यापुढे उत्पादकतेऐवजी उत्पन्न वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल मूल्यसाखळीचा भागधारक होणे ही काळाची गरज आहे.

या सगळ्या मुद्यांचा पट हाताळणे हा ॲग्रोवनचा यापुढील काळातला प्राधान्यक्रम असणार आहे, याची चुणूक सध्या दिसत आहे. नजीकच्या भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, मशीन लर्निंग, ऑटोमेशन, डायग्नोस्टिक टूल्स, रोबोटस, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलित शेतीच्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल राहील. त्यादृष्टीने ॲग्रोवन दैनिकही आपल्या स्वरूपात काळानुरूप बदल करून ‘ॲग्रिकल्चर ४.०’ या क्रांतीचे दरवाजे उघडण्यासाठी आपल्या माध्यमातून हातभार लावेल अशी मी अपेक्षा करतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com