Murud Beach Tourism : मुरूड किनाऱ्याचे पर्यटन बहरणार

Beach Beautification : अनेक महिन्यांपासून मुरूड किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
Beach Beautification
Beach BeautificationAgrowon
Published on
Updated on

Murud News : प्रदूषणविरहित हवा, विस्तीर्ण स्वच्छ समुद्रकिनारा, नारळ सुपारीच्या बागा, ऐतिहासिक जंजिरा व पद्मदुर्ग किल्ले, नबाब पॅलेस, उंच डोंगरावरील श्री दत्त मंदिर, खोकरीचे गुंबज आदी सौंदर्यस्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची सदैव गर्दी असते.

अनेक महिन्यांपासून मुरूड किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विजयादशमीपर्यंत काम पूर्ण झाल्यास पर्यटनाला झळाळी मिळण्याची शक्यता आहे. मुरूड-जंजिरा येथे लाखो पर्यटक दरवर्षी देश-विदेशाxतून येत असतात.

Beach Beautification
Agri Tourism Center : ‘आठवण मातीची, साठवण गोड क्षणांची

नारळ, सुपारीच्या बागायती, वाड्या सोडल्या, तर अन्य उत्पन्नाचे साधन नसल्याने स्थानिकांना पर्यटनपूरक व्यवसायावरच राहावे लागते. पर्यटकांची संख्या वाढावी, त्यांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी मुरूड किनारा सुशोभीकरणासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

Beach Beautification
New Mahabaleshwar Tourism Project : नव महाबळेश्‍वर : नियमबाह्य अन् बेकायदेशीरही

नगरपरिषदेच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. विजयादशमीपर्यंत प्रस्तावित कामांचा लोकार्पण सोहळा पार पडावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मावळतीचा मनोहर देखावा किनाऱ्यावर बसून न्याहळता यावा.

यासाठी पर्यटकांना आसन व्यवस्था केली आहे. पर्यटकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली असून एका वेळेस तेथे ४०० वाहने पार्क करता येणार आहे. मऊशार वाळूत अनवाणी चालणे, हा अनुभवही घेता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com