Palkhi Sohala: माऊलींची पालखी दिवेघाटात पोहचली; आजचा मुक्काम सासवडला

Sant Shrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi : दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर बुधवारी (ता.१४) सकाळीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलं.
Palkhi Sohala
Palkhi SohalaAgrowon
Published on
Updated on

Palkhi Update : दोन दिवसांच्या पुण्यातील मुक्कामानंतर बुधवारी (ता.१४) सकाळीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलं.

दुपारी चार वाजता दिवेघाट विठ्ठलाच्या जयघोषणा दुमदुमून निघाला, खांद्यावर भगवी पतका, टाळ-मृदुंग सुमधुर नादात दिवेघाटाचा अवघा परिसर भक्तिमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Palkhi Sohala
Palkhi Sohala: संत तुकराम महाराजांची पालखी पोहचली पुण्यात

माऊलींची पालखी आज रात्री सासवड येथे मुक्कामासाठी पोहचणार आहे. सासवड येथे दोन दिवसांचा मुक्काम होणार आहे. आज पुण्यातील हडपसर भागातून प्रस्थान करत माऊलींच्या पालखीनं उरळी देवाची येथे विसावा घेतला. 

पुढे वडकी नाका येथे विसावा घेतल्यानंतर दुपारी चार वाजता दिवेघाट चढाईला सुरुवात केली. विठ्ठलाच्या नामघोषात दंग झालेली हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झालेली पाहायला मिळाली.

दरम्यान,  २८ जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी माऊलींची पालखी पंढरपूरला पोहचेल. यंदा आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी वर्ग मोठ्या संख्येने वारीत सामील झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com