Polyhouse : शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ

Farmers Losing Land Due to Polyhouse Investments: संरक्षित शेती आर्थिक उत्कर्षाचा पर्याय ठरेल, या अपेक्षेने शेतकऱ्याने पॉलिहाऊस, शेडनेटची उभारणी केली. मात्र याच कारणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफडे त्यापुढील काळात शक्‍य झाली नाही.
Polyhouse
Polyhouse Agrowon
Published on
Updated on

Wardha News : संरक्षित शेती आर्थिक उत्कर्षाचा पर्याय ठरेल, या अपेक्षेने शेतकऱ्याने पॉलिहाऊस, शेडनेटची उभारणी केली. मात्र याच कारणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफडे त्यापुढील काळात शक्‍य झाली नाही.

परिणामी ४१ लाख रुपयांच्या थकित कर्जासाठी बॅंकेने त्यांच्या जमीन लिलावाची घोषणा केल्याने या शेतकऱ्यावर आता भूमिहिन होत उदरनिर्वाहाचे एकमेव साधन गमावण्याची वेळ आली आहे.

सेलू तालुक्‍यातील हिंगणीचे अजय डेकाटे यांनी २०११-१२ या वर्षात पॉलिहाऊसची उभारणी केली होती. त्याकरिता त्यांनी बॅंक ऑफ इंडियाकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. दरम्यान शासनाकडून त्यांना पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. अनुदान रक्‍कम सुरुवातीला मुदती ठेव योजनेत जमा केल्याने त्यांना त्यावर दोन लाख व्याज बॅंकेकडून देण्यात आले.

Polyhouse
Polyhouse : कोल्हापुरात पॉलिहाउसचा बाज हरवला

या सात लाख रुपयांचा भरणा त्यांनी कर्ज खात्यात केला. त्यापुढील काळात मात्र वादळी वाऱ्यामुळे वारंवार पॉलिहाऊसवरील कापड फाटल्याने त्यावर खर्च करावा लागला. विमा संरक्षण नसल्याने घरूनच पॉलिहाऊसच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च करावा लागत असल्याने त्यापुढील काळात खर्चासाठी रक्‍कम जोडणेच शक्‍य झाले नाही.

परिणामी पॉलिहाऊसचे साहित्य भंगारमध्ये विकावे लागले. वीस लाखापैकी सात लाख रुपयांच्या कर्ज रक्मेचा भरणा केल्यानंतर बॅंकेचे पुढील हप्तेही भरता आले नाहीत. त्यामुळे कर्ज थकित राहत ही रक्‍कम आता ४१ लाख ३८ हजार ८२५ रुपयांवर पोहोचली आहे.

या रकमेच्या वसुलीसाठी त्यांना कर्जवसुली प्राधिकरणाकडून जमीन लिलावाची नोटीस बजावण्यात आली आहे. परिणामी उत्कर्षाऐवजी भूमिहीन होत देशोधडीला लागल्याने या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते.

Polyhouse
Bamboo Polyhouse : : पॉलिहाउस उभारणीचा खर्च पन्नास टक्क्यांनी करा कमी

शेतकरी लागले देशोधडीला

सेलू तालुक्‍यात एका तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्याने बॅंक अधिकाऱ्याला हाताशी धरत शेतकऱ्यांना पॉलिहाऊस व शेडनेट घेण्यासाठी प्रोत्साहित केले. नागपूरलगत असल्याने शेडनेट, पॉलिहाऊसमधील पिकांची निर्यात होत चांगला पैसा मिळेल, असे स्वप्न या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. जाळ्यात फसलेल्या या शेतकऱ्यांच्या माध्यमातून २०११-१२ या एकाच वर्षात ४५ ते ५० शेडनेट, पॉलिहाऊसची उभारणी झाली. आता हे शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

संरक्षित शेतीसाठीचे कर्ज माफ व्हावे अशी मागणी आम्ही सातत्याने सत्ताधाऱ्यांकडे केली. आश्‍वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे माझ्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागली. काही मानसिक रुग्ण झाले, काही कुटुंबांची पूर्णपणे वाताहात झाली. मी मुद्दलपैकी २५ टक्‍के कर्ज रकमेचा भरणा करण्यास तयार आहे. परंतु बॅंक त्यासाठी इच्छुक नाही.
- अजय डेकाटे, शेतकरी, हिंगणी, सेलू, वर्धा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com