Team Agrowon
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रक्रियायुक्त बांबूपासून मजबूत, भक्कम असे पॉलिहाउस उभारणीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
प्रचलित लोखंडी पाइप्सवर आधारित पॉलिहाउसच्या तुलनेत उभारणी खर्च सुमारे ५० टक्के कमी होणार आहे.
कोकणासह राज्यातील समस्त शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाधारे शेती करून अर्थकारण उंचावणे शक्य होणार आहे.
कोकण विभागासाठी दापोली (जि. रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. कोकणात खरिपात प्रचंड पाऊस असतो. वादळवारेही सातत्याने सुरू असतात.
त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला, फुलपिके घेण्याला मर्यादा येतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन आणि उत्पन्नाचा हुकमी पर्याय शोधण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. संरक्षित म्हणजेच पॉलिहाउसमधील शेती हा त्यावर मार्ग होता.