Tilari Canal In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी पोटकालव्याला मणेरीत भगदाड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी (ता. दोडामार्ग) धरणाचा कालवा मंगळवारी (ता. ११) फुटला. त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
Tilari Cana
Tilari CanaAgrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी (ता. दोडामार्ग) धरणाचा कालवा मंगळवारी (ता. ११) फुटला. त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. दरम्यान या कालव्यावर अवलंबून असलेल्या काही गावांमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

तिलारी आंतरराज्य प्रकल्प असून याचे पाणी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जाते. तिलारी कालव्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर बनला आहे.

सातत्याने कालवे, पोटकालवे फुटण्याचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी तिलारी मोठा कालवा फुटल्यामुळे गोव्याकडे जाणारे पाणी बंद झाले होते.

Tilari Cana
Nira Canal : नीरा डावा कालवा तिसऱ्यांदा फुटला

याशिवाय अनेकदा पोटकालवे फुटले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. ११) पुन्हा एकदा मणेरी येथील पोटकालवा फुटला. त्या कालव्याची चार दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती.

मणेरीत काही शेतकऱ्यांनी पालेभाज्या, फळे, मिरची आदींची शेती केली आहे. माड, सुपारीचे झाडे, केळीच्या बागादेखील आहेत.

या सर्व बागायती पोटकालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कालव्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

तो मंजूर होताच तातडीने कॉक्रिटीकरण, बांधकाम ही कामे करण्यात येतील, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com