Unseasonal Rain : यावल, अमळनेर तालुक्यांत वादळी तडाखा

Crop Damage : शहरासह तालुक्यात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. शहरासह काही ठिकाणी हरभऱ्याएवढ्या गारा पडल्या आहेत.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Yawal News : शहरासह तालुक्यात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. शहरासह काही ठिकाणी हरभऱ्याएवढ्या गारा पडल्या आहेत. तालुक्यातील नायगाव येथे झाड कोसळून त्या खाली ट्रॅक्टर दबला असल्याचे वृत्त आहे. ग्रामीण भागात अनेक घरावरील पत्रे उडाली आहेत. वादळी पावसाने शेतीचे किती नुकसान झाले अद्याप समजू शकले नाही.

तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाचला जोरदार वादळासह गारांचा पाऊस पडला. तालुक्यातील नायगाव येथे एक झाड कोसळून त्याखाली ट्रॅक्टर दबल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितली तर किनगाव परिसरासह चुंचाळे, दहिगाव, सावखेडासीम, सातोद, वड्री, यासह सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना या वादळी पावसाचा फटका बसला आहे.

Crop Damage
Crop Damage : राज्यात ८८ हजार हेक्‍टर पिकांची धूळधाण

सुमारे पाऊण तास जोरदार वादळासह पाऊस सुरू होता. सध्या केळी कापणी सुरू असून, अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. वादळी पावसाने केळी, कांदा पिकाचे किती नुकसान झाले, हे मात्र समजू शकले नाही.

यावल येथे शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने पंचक्रोशीतील नागरिक येथे बाजार करण्यासाठी येतात. अचानक जोरदार वादळी पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह बाजारासाठी आलेल्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शहरातील नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Crop Damage
Crop Damage : नगरमधील नेवासा, श्रीगोंदा तालुक्यांत फळबागांना फटका

अमळनेरला नुकसान

दरम्यान, अमळनेर तालुक्यातील काही भागांसह शहरात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

दहिगाव परिसरत सर्वाधिक नुकसान

दहिगाव (ता. यावल) : यावल शहरासह दहिगाव, चौघडासिंग, कोरपावली, मोहराळा, मिरवली, हरिपुरा आदी भागांमध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यात गहू, मका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. जोरदार वादळात अनेक झाडे व केळी बागा आडव्या पडल्या. नेमके किती नुकसान झाले, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com