Women Loan : पावणेचार लाख महिलांना मिळणार ५३२ कोटींचे कर्ज

Women Loan : बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावांतील छोटी-मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे.
Women Loan
Women LoanAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील ३५ हजार ३०१ बचत गटांतील तीन लाख ७० हजार महिलांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ (मआविम) व ‘उमेद’तर्फे ५३२ कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनविण्याचा प्रयत्न ‘मआविम’ व उमेदतर्फे केले जात आहे.

बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावांतील छोटी-मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील तब्बल पावणेचार लाख महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे.

Women Loan
Women Self-Dependent : कहाणी तिच्या उद्यमशीलतेची!

महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे व ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाची चळवळ जिल्ह्यात वाढू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात ही चळवळ आणखी वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.

‘लखपती दिदी’तून वैयक्तिक कर्ज

केंद्र शासनाने महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गतवर्षी ‘लखपती दिदी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार २०० महिलांना व्यवसायासाठी एक ते अडीच लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळणार आहे. त्यासाठी संबंधित गरजू महिलांनी तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करायचा आहे. दरम्यान, जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून त्या महिलांना एकूण कर्जाच्या ३५ टक्के अनुदान मिळते.

Women Loan
Women Self Sufficient : नवा प्रयोग, नवी दिशा

नवीन बचत गट कसा काढायचा?

दहा महिला एकत्रित आल्यानंतर महिलांनी त्यांच्या पसंतीनुसार नगरपरिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा उमेद यापैकी एका संस्थेकडे जाऊन त्या ठिकाणी बचत गटाची नोंदणी किंवा ठराव करायचा असतो. त्या ठरावानुसार बॅंकेत अध्यक्ष व सचिव महिलेच्या नावे खाते उघडावे लागते.

त्यानंतर संबंधित संस्थेकडे या बचत गटाची ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी होते. मग, सुरवातीला १५ हजार रुपयांचा फिरता निधी दिला जातो, तो परत करावा लागत नाही. सहा महिन्यांनी ६० हजार रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी मिळतो, तो परत करावा लागतो. त्याची परतफेड व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना बॅंकांच्या माध्यमातून बचत गटासाठी कर्ज घेता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com