Women Self Sufficient : नवा प्रयोग, नवी दिशा

Article by Vijay Sukalkar : महिलांना नव्या व्यवसायाची दिशा दाखवली, त्याबाबत त्यांना योग्य प्रशिक्षण दिले आणि तांत्रिक-आर्थिक मदत केली की कोणताही प्रयोग त्या यशस्वी करून दाखवतात, हेच शेवाळ शेती प्रकल्पातून त्यांनी दाखवून दिले आहे.
Women
WomenAgrowon
Published on
Updated on

Women Self Dependent : कोकणामध्ये शेतीसह कोणत्याही उद्योग व्यवसायाला फार मर्यादा आहेत. पारंपरिक भात शेती आणि नारळ-सुपारीच्या बागांतून जेमतेम उदरनिर्वाह भागतो. मात्र त्यातून फारशी आर्थिक मिळकत आणि बचत काही होत नाही. समुद्रकिनाऱ्यावरील गावातील महिला-पुरुष मासेमारी व्यवसाय करतात. परंतु अलीकडच्या काळात समुद्राचे वाढते प्रदूषण आणि परराज्यांतून यांत्रिक बोटीच्या साह्याने होणाऱ्या अनधिकृत, अनैसर्गिक मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती आता काही लागताना दिसत नाही.

कोकणातील काही महिला नारळ कोकम यासह इतरही फळांवर घरगुती प्रक्रिया करून ‘कोकणचा मेवा’ म्हणून प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारात आणत आहेत. अर्थात, या सर्वांना मर्यादा असल्यामुळे खासकरून कोकणातील महिला नवनव्या शेती, उद्योग-व्यवसायाच्या वाटा शोधत असतात. रत्नागिरी तालुक्यातील काजिरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी या तीन गावांतील शंभर महिलांनी समुद्र शेवाळाच्या शेतीतून आर्थिक मिळकतीचा नवा मार्ग शोधून त्या स्वावलंबी झाल्या आहेत.

महिलांना नव्या व्यवसायाची दिशा दाखवली, त्यांना त्याबाबत योग्य प्रशिक्षण दिले आणि तांत्रिक-आर्थिक मदत केली, की आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कोणताही प्रयोग त्या यशस्वी करून दाखवतात हेच महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभाग आणि क्लायमा क्रु प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुरू केलेल्या शेवाळ शेती प्रकल्पातून त्यांनी दाखवून दिले आहे.

भविष्यात हीच शेवाळ शेती कोकणातील महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देऊ शकते, असा विश्‍वास महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमरीश मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे. पारंपरिक पिकांची शेती किफायतशीर ठरत नसताना शेवाळ शेती व्यवसाय खासकरून महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकते, हा आशावाद या प्रकल्पातून निर्माण झाला आहे.

Women
Women Self-Dependent : कहाणी तिच्या उद्यमशीलतेची!

समुद्री शेवाळ हे सागरी वनस्पती तसेच एकपेशीय वनस्पतीचा समूह असून त्यात ब्ल्यू अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी, रेड अल्गी अशा प्रकारात अगणित प्रजाती आढळून येतात. हे सागरी शेवाळ समुद्राबरोबर नदी, तलाव याशिवाय इतरही जलस्रोतांमध्ये वाढते. रत्नागिरी तालुक्यातील प्रकल्पात वापरलेले शेवाळ हे ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ या प्रकारातील आहे. हा प्रकार रेड अल्गी मध्ये मोडतो. या शेवाळ प्रकाराचे कल्चर इंडोनेशिया या देशात मोठ्या प्रमाणात केलेले आहे.

तिथे या शेवाळाची वाढ करून त्याचा वापर अनेक वर्षांपासून सुरू आहे. आपल्याकडे आता त्याची शेती करून वापर वाढणार होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. या शेवाळाचा उपयोग आपल्याकडे आता सेंद्रिय खत म्हणून होणार आहे. याव्यतिरिक्त कॅपाफायकस अल्वारेझी हे शेवाळ इंडोनेशियात टूथपेस्ट, डेअरी उत्पादने आणि जेली करण्यासाठी होतो.

Women
Farmers Guarantee : हमीभावाकडून उत्पन्न हमीकडे...

या शेवाळातील पॉलिसॅकाराइड हे अन्न म्हणून पण वापरले जाते. यात पोषणमूल्यांचे प्रमाणही अधिक आहे. शिवाय ‘अँटी फ्लोरिफेरेटिव्ह’ गुणधर्म असल्यामुळे याने कॅन्सर तसेच हृदयविकारासारखे आजार कमी होतात. काही गावांत झालेल्या शेवाळ शेतीच्या प्रयोगाची व्याप्ती संपूर्ण कोकणासह देशभरातील किनारपट्टा भागात व्हायला हवी.

शेवाळाची ही प्रजाती नदी, तलावातही वाढत असताना याचे प्रयोग इतरही जलसाठ्यांत करायला हवेत. अशावेळी शेवाळ शेतीसाठी लागणारे कल्चर पुरविण्याचे काम सागरी संशोधन संस्थांनी करायला पाहिजे. देशभरातील महिलांना याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे काम सागरी संशोधन संस्थांसह त्या त्या राज्यांतील मत्स्य व्यवसाय विभागाने करायला हवे.

जापान, इंडोनेशिया या देशांत या शेवाळाच्या उपयुक्ततेवर बरेच काम झालेले असताना त्या देशाच्या मदतीने सेंद्रिय खताशिवाय अन्न, इंधन, औषधी आदी उद्योगात याचा वापर कसा वाढेल, हेही पाहावे. असे झाल्‍यास देशाच्या समुद्र किनारी भागात शेवाळ शेती बहरेल, याच्या उद्योग-व्यवसायातील वापरातून रोजगार निर्मिती वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com