Lightning Deaths News: छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

Unseasonal Rain Issue: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत तीन ठिकाणी सोमवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Lightning Strikes
Lightning StrikesAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत तीन ठिकाणी सोमवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वादळी पाऊस व गारपिटीने आंबा, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. तर परभणी व जालना जिल्ह्यांत वीज पडून तीन जनावरेही दगावल्याची घटना घडल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील रामनगर येथे गारांसह पाऊस झाला. याशिवाय बदनापूर तालुक्यातील सायगाव साजा अंतर्गत सायगाव, बुटेगाव, रांजणगाव, शेलगाव, मात्रेवाडी, जवसगाव, राजेवाडी, चिखली मंडलांतर्गत उज्जैनपुरी, राळा, कंडारी बुद्रुक, हिवरा, राळा, बावणेपांगरी मंडलांतर्गत तुपेवाडी, पठार देऊळगाव येथे कमी प्रमाणात, तर केळीगव्हान सजा जास्त प्रमाणात झाली आहे.

Lightning Strikes
Rain In Maharashtra : जालना, छत्रपती संभाजीनगरला वादळी वारा, पाऊस, गारपिटीचा दणका

हिवराराळा, निकळक व वाल्हा, केळीगव्हाण, भराडखेडा नजीक, पांगरी, पाचेगाव, सोमठाणा, अकोला, वाल्हा, सागरवाडी, निकळक भराडखेडा, केळीगव्हाण, कंडारी बुद्रुक आदी शिवारांत कमी-अधिक प्रमाणात गारपीट झाली. भोकरदन तालुक्यात भोकरदन शहरामध्‍ये, जाफराबाद तालुक्यात डोणगाव येथे तुरळक गारांसह पाऊस​ झाला.

अंबड तालुक्यात मठ पिंपळगाव, पानेगाव येथे गारांसह पाऊस झाला. पानेगाव सजा अंतर्गत पानेगाव, दूधपुरी व काटखेडा, ताडहदगाव सजा अंतर्गत ताडहदगाव व ढालसखेडा या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस व गारा पडल्या. या शिवारात कांदा पिकाचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचोली माळी, हादगाव, डोका, सारुकवाडी या परिसरांत गारांसह अवकाळी पाऊस झाल्याची माहिती आहे.

Lightning Strikes
Unseasonal Rain: राज्यातील ६ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

वीज कोसळून जीवितहानी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कोडापूर येथील वस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के (वय २२) या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सचिन मधुकरराव मगर यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील अभिमन्यू पांडुरंग नलभे (वय ३६), यांचा सोमवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

तीन जनावरे दगावली

जालना जिल्ह्यातील परतूर येथील गट नंबर २७१/२ मध्ये शेख मुख्तार शेख अख्तर कुरेशी यांचा एक बैल वीज पडून दगावला. तर परभणी जिल्ह्यातील कोरवाडी (ता. जिंतूर) येथील समाधान सुदाम कोंडाळ यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून गाय आणि वासरू जागीच ठार झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com