Bank Existence : तीन बँकांची नोंदणी रद्द, सात अवसायनात

Banks in Danger : सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ लागल्या आहेत. गेल्या २२ वर्षांत १० सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Bank
BankAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ लागल्या आहेत. गेल्या २२ वर्षांत १० सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दहा पैकी तीन बँकांची नोंदणीच आता रद्द झाली आहे. तर सात बँका अद्यापही अवसायनात आहेत. या बँका पुन्हा उभा राहण्याची शक्यता कमीच आहे.

सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँक २००३ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती. सोलापूर मर्चंट को. ऑप. बँक २००३ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती. सेवालाल अर्बन को. ऑप. बँक २००२ मध्ये अवसायनात घेण्यात आली होती.

Bank
Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला १०० कोटींचा नफा

या तिन्ही बँकांची आता नोंदणी रद्द झाल्याने सहकारातून या बँकांचे अस्तित्व कायमस्वरूपी संपले आहे. तर त्याशिवाय सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक, इंदिरा श्रमिक महिला सहकारी बँक, सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक, भारत अर्बन को. ऑप. बँक, अर्जुन अर्बन को. ऑप. बँक, स्वामी समर्थ सहकारी बँक, लक्ष्मी अर्बन को. ऑप. बँक या सात सहकारी बँका सध्या अवसायनात आहेत.

दोन वर्षात जिल्ह्यातील जवळपास सात सहकारी पतसंस्थांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मंगळवेढ्यातील मंगळवेढा म्युनिसिपल एम्प्लॉईज क्रेडिट को. ऑप. सोसायटी, खंडाळी येथील मोतीचंद कोठाडिया ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, वळसंग येथील सिद्धेश्‍वर महिला ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, लिंबी चिंचोळी येथील स्वामी समर्थ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था,

Bank
District Bank : जिल्हा बॅंकांमध्ये नेमणार सहकार प्रशिक्षणार्थी

मंद्रूप येथील साहेब हजर काझी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, कंदलगाव येथील भैरवनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था, करमाळ्यातील म्युनिसिपल सर्वन्ट को. ऑप. क्रेडिट सोसायटी, करमाळ्यातील रणजितसिंह मोहिते-पाटील ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था,

मोहनलाल दोशी नागरी सहकारी पतसंस्था अशा जिल्ह्यातील नऊ पतसंस्थांवर एक ते दोन वर्षांत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ आर्थिक शिस्त न पाळल्याने एकेकाळी सहकारामध्ये दबदबा असणाऱ्या या बँका आणि पतसंस्थांची सद्यःस्थिती अत्यंत वाईट झाली आहे

ज्यांची पत आहे व ज्यांची कर्जफेडीची स्थिती आहे, त्यांना कर्जपुरवठा करावा. खाते एनपीएमध्ये गेल्यानंतर वसुलीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा, पहिला हप्ता थकल्यानंतरच वसुलीची प्रक्रिया गतिमान करावी. तारण व विनातारण कर्जासाठी आरबीआयने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. लेखापरीक्षणासाठी अचूक व्यक्ती नेमावी. लेखापरीक्षणातून समोर आलेल्या स्थितीनूसार आर्थिक संस्थेच्या व्यवस्थापनाचे काम करावे.
किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com