Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला १०० कोटींचा नफा

Bank Profit During the Financial Year : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने या आर्थिक वर्षात १०० कोटी ढोबळ नफा मिळविला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
Sindhudurg District Bank
Sindhudurg District Bank Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने या आर्थिक वर्षात १०० कोटी ढोबळ नफा मिळविला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात श्री. दळवी यांची पत्रकार परिषद झाली.

या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक नीता राणे, समीर सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते.

Sindhudurg District Bank
District Bank : जिल्हा बॅंकांमध्ये नेमणार सहकार प्रशिक्षणार्थी

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात ९८ शाखा आहेत. बँकेने गेल्या अनेक वर्षांचा चढता आलेख कायम ठेवला आहे. ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ आणि निव्वळ नफा यामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.

Sindhudurg District Bank
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेला ‘आयएसओ’ मानांकन

२०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने १०० कोटींचा ढोबळ नफा मिळविला असल्याचे श्री. दळवी यांनी स्पष्ट केले. बँकेमार्फत नियमित बँकिग सेवांसह आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, मोबाइल ॲप, आयएमपीएस, यूपीआय, ईकॉम, क्युआर कोड, एबीपीएस, बीबीपीएस, मायक्रो एटीएम, सीटीएस, ई-मेल अकाऊंट स्टेंटमेंट, इत्यादी सेवा पुरविल्या जात आहेत.

ग्राहकांसाठी उत्तमोत्तम सेवा पुरविण्यावर बँकेचा भर आहे. त्यामुळेच बँकेची प्रगती होत आहे. ३१ मार्चअखेर बँकेचा स्वनिधी ४८४.१३ कोटी, खेळते भांडवल ३ हजार ७३५.६३ कोटींवर पोहोचले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com