Siddheshwar Yatra Solapur : श्री सिद्धेश्‍वर महायात्रेचे सूक्ष्म नियोजन करावे ; उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे

Siddheshwar Yatra : श्री सिद्धेश्‍वर महायात्रा १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत होत असून, या यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
Siddheshwar Yatra Solapu
Siddheshwar Yatra SolapuPune
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर ः श्री सिद्धेश्‍वर महायात्रा १२ ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत होत असून, या यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

या यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी श्री सिद्धेश्‍वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, ही महायात्रा शांततेत व नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी सबंधितांनी परस्परात समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिल्या.

Siddheshwar Yatra Solapu
Siddheshwar Yatra : सिद्धेश्वर यात्रा आयोजनासाठी समन्वय ठेवा

नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्‍वर महायात्रा २०२५ अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी पडदुणे बोलत होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क भाग्यश्री जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश किणगी, विद्युत विभागाचे शाखा अभियंता यू.एस.पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्री. लेंगरे, महावितरण सोलापूर शहरचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, यांच्यासह पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी पडदुणे म्हणाले, की यात्रा कालावधीत मंदिर, मंदिर परिसर व होम मैदान या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असावी. पोलिस विभागाने यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची गर्दी विचारात घेता योग्य नियोजन करावे. होम मैदानावर होणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी मंदिर समिती, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने तसेच या ठिकाणी स्टॉल लावणारे विक्रेते यांना त्यांच्या स्टॉलसाठी किती जागा आवश्यक आहे याची अचूक मागणी नोंदवून त्या पद्धतीने नियोजन करावे व सुरक्षेच्या दृष्टीने हे स्टॉल सुटसुटीत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री सिद्धेश्‍वर महायात्रा कालावधी जवळपास एक महिन्याचा असल्याने या कालावधीत सर्वसामान्य नागरिक भक्तगण यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक विभागाने वाहन व्यवस्था पार्किंगची व्यवस्था, महानगरपालिका, मंदिर समितीने व अन्न सुरक्षा विभागाने अन्न पदार्थ तपासून घेणे व त्यांच्याकडील होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट वेळेत व योग्य ठिकाणी लावावी, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com