Siddheshwar Yatra : सिद्धेश्वर यात्रा आयोजनासाठी समन्वय ठेवा

IAS Kumar Ashirwad : श्री सिद्धेश्वर यात्रा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
Siddheshwar yatra
Siddheshwar yatraAgrowon

Solapur News : सोलापूर शहरात एक जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर यात्रा (गड्डा यात्रा) भरते. तर १२ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत अक्षता सोहळ्यासह अन्य धार्मिक विधी पार पाडले जातात, ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर यात्रा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.

Siddheshwar yatra
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांविरुद्ध दाखल गंभीर गुन्हे परत घ्या

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सोलापूर प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसीलदार सैफान नदाफ, महापालिकेचे सिटी इंजिनियर श्री. चलवदी, मंदिर समितीची पंच कमिटी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढेले, विभागाचे अधिकारी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, ‘‘श्री सिद्धेश्वर यात्रा कालावधीत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, या दृष्टीने संपूर्ण नियोजन करावे. मंदिर परिसर, होम मैदान व शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही, याचे नियोजन करावे. पोलीस विभागाने वाहतुकीचे व गर्दीचे नियंत्रण व्यवस्थितपणे करावे, पोलिस विभागाने त्यासाठी बंदोबस्त चोखपणे ठेवावा,’’

Siddheshwar yatra
Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरू

असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी संपूर्ण यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे मंदिर समिती व सर्व संबंधित विभागांनी कामकाज पार पाडावे, अशा सूचना दिल्या.

तर प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी यात्रा कालावधीत प्रत्येक शासकीय विभागाची तसेच मंदिर समितीच्या विविध जबाबदाऱ्या व त्यांनी करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पंचकमिटी सदस्यांनी मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात भाविक यांच्यासाठी करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com