Dangerous Buildings : तीस हजार जीव टांगणीला

Monsoon Season : पावसाळा आल्यावर भिवंडी शहरात इमारत दुर्घटनांचे नाते जुने आहे. गेल्या काही वर्षांत मुसळधार पावसामुळे अतिधोकादायक इमारती कोसळल्याने अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत.
Dangerous Buildings
Dangerous Buildings Agrowon

Bhiwandi News : पावसाळा आल्यावर भिवंडी शहरात इमारत दुर्घटनांचे नाते जुने आहे. गेल्या काही वर्षांत मुसळधार पावसामुळे अतिधोकादायक इमारती कोसळल्याने अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर जुन्या इमारतींमधील नागरिकांना नोटीस बजावण्याचे सोपस्कार प्रशासनाकडून पार पाडले जाते. या इमारतींमधील नागरिकांचे स्थलांतर न केल्याने २८७ इमारतींमधील ६,०४१ कुटुंबांतील ३० हजार नागरिकांचा जीव पावसाळ्यात टांगणीला लागलेला आहे.

भिवंडी महापालिकेच्या परिसरात महापालिकेच्या बीट निरीक्षकांनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार सी-१, सी-२, सी-३ श्रेण्यांमध्ये एकूण १,३११ धोकादायक इमारती आहेत. दरम्यान, पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर अन्य श्रेणींतील इमारतींची डागडुजी करण्यास सांगितले आहे, मात्र सी-१ आणि सी-१अ इमारतींतील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

Dangerous Buildings
Soybean Varieties : सोयाबीन वाणांची गुणवैशिष्ट्ये

असे असताना पालिकेच्या कारवाया थंडावल्याने जागरुक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही प्रशासन या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींबाबत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर भिवंडीतील १,३११ पैकी २८७ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे जीव टांगणीला लागल्याचे भयाण चित्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे समोर आले आहे. पालिका आणि महसूल प्रशासन यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Dangerous Buildings
Fruit Crop Insurance Scheme : फळपीक विमा योजनेची नियमावली

१० वर्षांत ६८ जणांचा बळी

२०१४ ते २०२४ पर्यंत शहर आणि शहराबाहेरील ६८ पेक्षा अधिक जीवांना आपला प्राण गमवावा लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षांत तब्बल ६८ जणांचा बळी गेल्याने भिवंडी परिसरात इमारती कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

मागील दहा वर्षांतील दुर्घटना

२०१४ मध्ये गैबी नगर आणि पिराणी पाडा येथील दुर्घटनांत १२ जणांचा मृत्यू.

२०१५ मध्ये आसबीबी येथील दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू. गौरीपाड्यात दोघांचा बळी.

२०२० मध्ये जिलानी इमारत दुर्घटनेत ३८ जण गतप्राण.

२०२३ मध्ये वर्धमान कंपाऊंडमधील दुर्घटनेत आठ जणांनी जीव गमवला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com