Farmer Oil Industry : लाकडी तेलघाणा उद्योग ठरला समृद्धीचे कारण

Rural Enterpreneurship: असे म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे! याच विचाराला सार्थकी ठरवित आत्महत्याप्रवण अशी ओळख असलेल्या यवतमाळ येथील गायकी कुटुंबीयांनी लाकडी तेलघाणा उद्योगाची उभारणी केली.
Gayki Family
Gayki FamilyAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News: असे म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे! याच विचाराला सार्थकी ठरवित आत्महत्याप्रवण अशी ओळख असलेल्या यवतमाळ येथील गायकी कुटुंबीयांनी लाकडी तेलघाणा उद्योगाची उभारणी केली. आज हाच शेतीपूरक व्यवसाय त्यांच्या आर्थिक सक्षमतेचे साधन ठरला आहे.

रूपाली आशिष गायकी यांच्या कुटुंबाची टेंभूर्णी शिवारात जेमतेम साडेतीन एकर जमीन आहे. कपाशी, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांचा पॅटर्न या कुटुंबीयांनी जपला आहे. मात्र त्यातून आर्थिक गरजांची पूर्तता करणे अडचणीचे ठरत असल्याने त्याच्या जोडीला त्यांनी पूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सध्या आरोग्याप्रती जागरुकता वाढली आहे, त्यातही खाद्यान्नाबाबत ग्राहक अधिक खातरजमा करतात.

Gayki Family
Agrowon Newspaper Success Story: तयाचा वेलू गेला गगनावरी!

त्यामुळेच लाकडी घाणा तेल प्रकल्प उभारण्याचे ठरले. त्याकरिता आवश्‍यक तांत्रिक माहिती कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मिळाली. युनियन बॅंक ऑफ इंडियांकडून तीन लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यावर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेतून ३५ टक्‍के अनुदान मिळाले.

पैशाची उपलब्धता झाल्यानंतर सयंत्र गुजरातमधून साडेतीन लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. सध्या पहिल्या टप्प्यात कच्च्या मालाची खरेदी बाजारपेठेतून होते. सध्या यवतमाळमध्ये सहा लाकडी घाणा उद्योग आहेत. आम्ही सर्वांनी मिळून एक संघ तयार करीत येत्या काळात थेट शेतकऱ्यांपासून कच्चा शेतीमाल खरेदीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती रूपाली यांनी दिली.

Gayki Family
MPSC Success Story: शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश

खोबरेल, जवस, तीळ, भुईमूग, करडई, सूर्यफूल, जवस, बदाम यापासून तेल उत्पादन होते. एखाद्या ग्राहकाला कच्च्या मालापासून तेल काढायचे असल्यास त्याकरिता भुईमूगसाठी ४० रुपये किलो असा दर आहे. १२ किलो भुईमूग दाण्यातून पाच ते साडेपाच किलो तेल मिळते. तीळ, शेंगदाणा, खोबरा याचा तेल उतारा अधिक राहतो, असेही त्यांनी सांगितले. राघवी ब्रॅण्डने तेलाची विक्री होते.

भुईमूग तेल हे अर्धा ते लिटर ते पाच लिटर तर इतर सर्व तेलबियांपासून उत्पादित तेल १०० मिली ते एक लिटर पॅकिंगमध्ये आहे. भुईमूग तेलाची महिन्याला २०० लिटर तर उर्वरित तेल हे सरासरी दहा लिटर विकले जाते. अभिनव कॉलनी (संदीप मंगलम लगत) भागात तेल विक्रीचे आऊटलेट रूपाली यांनी उघडले आहे.

असा आहे तेलाचा दर प्रति लिटर (रुपये)

भुईमूग २९०

तीळ ४०० ते ४५०

खोबरा ५००

करडई ४००

सूर्यफूल ४००

रूपाली आशिष गायकी

९७६३१७५१०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com