Water Wheel : 'वॉटर व्हील'मुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली

Water Wheel Distribution : महिलांचे कष्ट कमी व्हावेत व अधिक पाणी आणता यावे, यासाठी सामाजिक संस्थांकडून वॉटर व्हीलचे वाटप करण्यात येते.
Water Wheel
Water WheelAgrowon

Javhar News : अतिदुर्गम, ग्रामीण, आदिवासी परिसर म्हणून जव्हार तालुका ओळखला जातो. या भागात डोंगर, दरीकपारीत मोठी लोकवस्ती वसलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भेडसावते. महिलांना लांबहून पाण्याचे हंडे भरून डोक्यावरून वाहावे लागतात. महिलांचे कष्ट कमी व्हावेत व अधिक पाणी आणता यावे, यासाठी सामाजिक संस्थांकडून वॉटर व्हीलचे वाटप करण्यात येते.

Water Wheel
Water Level : शिराळा तालुक्यातील पाणीसाठ्यात घट, सात तलाव कोरडे

या व्हीलमुळे दोन ते तीन हंडे पाणी वाहतूक करणे सोपे होते. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्यास मदत झाली, असे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. वॉटर व्हीलने पाणी वाहतूक करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

Water Wheel
Water Crisis : टंचाईत जलसाठ्यावर प्रशासनाची नजर

लांब अंतराहून पाणी वाहतूक करणाऱ्या गाव-पाड्यांना याचा फायदा होत आहे. वॉटर व्हील प्रत्यक्षात आफ्रिका खंडात विकसित झालेली संकल्पना आहे. ही पद्धत पहिल्यांदा तिथे अवलंबली गेली. त्याला यश मिळाल्याने भारतात त्याची प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी त्या विकसित करून बाजारात उपलब्ध करून दिली आहे. साधारण या व्हीलची किंमत चार हजार रुपयांपर्यंत आहे.

पाणी भरताना एका बाजूला झाकण देण्यात आले असून, त्यात पाणी भरून, टायरसारखे ढकलत थेट पाणी घरापर्यंत नेता येते. वाहतुकीस सोपे असल्याने याला महिलांकडून पसंती दिली जाते. वॉटर व्हीलमुळे टंचाईग्रस्त भागात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, सरकारकडून अद्याप वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद नसल्यामुळे सामाजिक संस्थांच्या मदतीची वाट बघावी लागते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com