Water Storage : मराठवाड्यात ११ पैकी ५ मोठे प्रकल्प मृत साठ्यात

Water Scarcity : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल पाच मोठे प्रकल्प मृत साठ्यात आहेत.
Water Crisis
Water Crisis Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल पाच मोठे प्रकल्प मृत साठ्यात आहेत. मध्यम व लघू प्रकल्पांची अवस्थाही गंभीर असल्याने टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.

मराठवाड्यात एकूण ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये जायकवाडी, निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मानार, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सीना कोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. या मोठ्या प्रकल्पांपैकी ७६.६५७ टीएमसी उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता असलेल्या सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात आताच्या घडीला केवळ ४.०४ टक्के म्हणजे ३.०९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दूधना या ८.५६२ पीएमसी उपयुक्त साठ्याची क्षमता असलेल्या प्रकल्पातही ०.५३ टीएमसी म्हणजे ६.२३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरी प्रकल्पाची क्षमता २८.५६९ टीएमसी असून, आताच्या घडीला या प्रकल्पामध्ये ७.६२ टीएमसी म्हणजे २६.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Crisis
Water Scarcity : पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद

२.८५९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या सिद्धेश्‍वर प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. मृतसाठ्यात गेलेल्या या प्रकल्पात ४.५६३ टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे. माजलगाव या ११.०१७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असलेल्या प्रकल्पातही उपयुक्त पाण्याचा थेंब नाही.

मृतसाठ्यात गेलेल्या या प्रकल्पात ३.६८५ टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे. मांजरा प्रकल्पातही उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. ६.२४९ टीएमसी उपयुक्त साठ्याची क्षमता असलेल्या मात्र मृतसाठ्यात गेलेल्या या प्रकल्पात १.५६१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Crisis
Water Scarcity : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई

पैनगंगा प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे क्षमता ३४.०४२ टीएमसी इतकी आहे. आताच्या घडीला या प्रकल्पात केवळ ९.९५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जो एकूण उपयुक्त पाणी साठ्याच्या क्षमतेच्या तुलनेत २९.२३ टक्के इतका आहे. निम्न तेरणा व सीमा कोरेगाव हे दोन्ही मोठे प्रकल्प मृत साठ्यात आहेत.

या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ०.९३४ टीएमसी व ०.३५७ टीएमसी असा मृत साठ्यातील पाणीसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची उपयुक्त पाण्यासाठी क्षमता ४.८८० टीएमसी इतकी आहे त्या तुलनेत या प्रकल्पात उणे १.१० टीएमसी आणि साठा शिल्लक असल्याचे माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com