Warana Dairy Industry : प्रक्रिया उत्पादनांचा वारणा पॅटर्न

Diwali Article 2024 : वारणा खोऱ्यात तात्‍यासाहेब कोरे यांनी दूध उत्‍पादकांचे जाळे निर्माण केले. आज दूध प्रक्रिया उत्पादनांचा ‘वारणा ब्रॅण्ड’ देशभर आपले वेगळेपण सिद्ध करीत आहे.
Warana Dairy
Warana Dairy Agrowon
Published on
Updated on

Warana Dairy : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना जोडणारी वारणा नदी. याच नदीचा आसपासचा भाग वारणा खोरे ओळखला जातो. वारणा ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी, जी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. वारणा नदीचा उगम सह्याद्री रांगेतील पाथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर होतो.

पुढे ही नदी सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे कृष्णा नदीस मिळते. वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आहे. वारणा नदीच्या सुपीक खोऱ्यात भात, ज्वारी, ऊस, भुईमूग, सोयाबीन ही महत्त्वाची पिके. कोल्हापूर, सांगली हे जिल्हे म्हणजे सहकाराचे बालेकिल्ले. या जिल्ह्यांत सहकार रुजला. अनेकांनी सहकारातून सुरुवात करून राजकारणातही कारकीर्द गाजवली.

Warana Dairy
Dairy Processing Industry : विद्यार्थ्यांनो, दुग्धप्रक्रिया उद्योजक होऊया...

याच मुशीत तयार झालेले सहकारमहर्षी कै. तात्‍यासाहेब कोरे यांची दृष्टी मात्र वेगळी होती. सामाजिक, आर्थिक, शिक्षण आणि विकास या तत्त्वांशी ते ठाम राहिले. त्यांनी उभारलेला वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह यातून गावशिवाराचा विकास महत्त्वाचा विषय ठेवला. यातून साखर कारखाना, दूध संघाचे रोपटे लावले. तात्यासाहेब कोरे यांनी सन १९६८ मध्ये ‘श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघा’ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी ‘श्री वारणा सहकारी साखर कारखान्या’ची स्थापना केली होती. शेतीला पशुपालन व्यवसायाची जोड देऊन वारणा खोऱ्याचे नंदनवन केले. त्यांची कुशाग्र कल्पक वृत्ती आणि अविश्रांत मेहनत ही वारणा खोऱ्यातील हजारो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात कृषी अन् धवलक्रांती घडविणारी ठरली.

Warana Dairy
Dairy Farming : दुग्ध व्यवसाय, संकलन, प्रक्रियेतून भक्कम केले शेतीचे अर्थकारण

प्रक्रिया उत्पादनांवर भर

वर्गिस कुरियन यांच्याप्रमाणे तात्‍यासाहेब कोरे यांनी वारणा खोऱ्यात दूध उत्‍पादकांचे जाळे निर्माण केले. यातून मिळणारा नफा त्यांनी शेतकऱ्यांना दिलाच, त्याचबरोबरीने सहकारी तत्त्वावरील दूध संघात तयार झालेली उत्‍पादने कशी लोकप्रिय करायची, याचे बाळकडू तात्यासाहेबांनी सगळ्या सहकारी तत्त्वावरील दूध संघांना दिले. सहकारी दूध संघाने तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्री तंत्राचे ते आद्य प्रवर्तक बनले.

खासगी क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देत त्यांनी आपल्या कौशल्‍याचा वापर केला. राज्यात प्रथमच १९८०-८१ मध्ये पॉलिपॅकमधून थेट ग्राहकांना दूध विक्री सुरू केली. सहकारी संघाने सुरु केलेला हा पहिलाच प्रयोग होता. सातत्याने नावीन्याचा ध्यास असणाऱ्या तात्यासाहेबांनी विक्री करताना शासकीय, निमशासकीय संस्‍थांचे सहकार्य घेतले. अशा संस्‍थांच्या विक्री केंद्रामधून दुधाची विक्री कशी वाढेल, हे पाहिले. विक्रीचे अधिकारी नेमताना अतिशय चोखंदळपणे निवडले. त्याचा चांगला फायदा झाला.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com