Drought : दुष्काळाने शेतकरी हतबल; चालवली मोसंबी बागेवर कुर्‍हाड

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला. याचा थेट फटका यंदा बसत आहे. अजून उन्हाळा बाकी असून आत्ताच शेतातील पिके आणि फळबागा वाळत आहेत.
Drought
DroughtAgrowon

Chhatrapati Sambhajinagar/Pune News : गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला. याचा थेट फटका यंदा बसत आहे. अजून उन्हाळा बाकी असून आत्ताच शेतातील पिके आणि फळबागा वाळत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने हाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेल्या मोसंबी बागेवर रविवारी (ता.१७) कुर्‍हाड चालवली. कचनेरमधील (ता. पैठण) बप्पासाहेब भानुसे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी हताश होऊन २०० मोसंबी झाडांची बाग नष्ट केली. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी हा शेतीला पर्याय शोधत आहे. शेतकरी पारंपारिक शेतीऐवजी उत्पन्नाची चांगली गॅरेंटी देणाऱ्या फळबागा लागवडीचा पर्याय निवडत आहेत. मात्र फळबागांदेखील वातावरणीय बदलांचा परिणाम होत असून शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदील होत असून नैराश्यात जात आहे. 

Drought
Drought Update : दुष्काळाबाबत सवलतींची अंमलबजावणी करण्याची मागणी

गेल्या वर्षी सरसरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मार्च महिन्याच्या मध्यातच राज्याच्या अनेक भागात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. याचा थेट फटका आता फळबागांना बसत असून कचनेर परिसरातील शेतकऱ्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पण आर्थिक तंगीमुळे तेही आता शक्य होताना दिसत नसल्याचे दिसत आहे.  

बप्पासाहेब भानुसे या शेतकऱ्याने कड्या मेहनतीने पाच वर्षात २०० झाडांची मोसंबी बाग जगवली होती. ही बाग त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तळहाताप्रमाणे जपली होती. येणाऱ्या काळात फळ मिळण्याची शक्यता असतानाच दुष्काळामुळे ती वाळत आहे. यामुळे हसाश होऊन भानुसे यांनी रविवारी आपल्या २०० झाडांची मोसंबी बागेवर कुऱ्हाड चालवली. तर आता त्यांना या बोगतून उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली होती. मात्र फक्त पाणी मिळत नसल्याने त्यांना या बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com