
Maize Crop : भारतात मक्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते. उत्तर भारतात मक्याचा उपयोग आहारात मोठ्या प्रमाणात होतो. तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य आणि कुक्कुट खाद्य म्हणून वापरल जात. मक्याच्या दाण्यातील अंकुरापासून तेल मिळत. मक्यापासून विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात.
मक्यावर प्रामुख्याने कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया अशा दोन प्रकारे प्रक्रिया होते. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी, रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येत. मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, अंकुर आणि पेंड सहजरीत्या वेगळी करता येतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च, साखर,तेल, पेंड यांचा वापर कापड, कागद, औषधे, बेकरी या व्यवसायात केला जातो.
मक्याच्या विविध प्रकारानूसार त्याचे विविध वाण आहेत. साधा मका, प्रथिनयुक्त मका, बेबीकॉर्न, मधू मका असे मक्याचे विविध प्रकार आहेत. जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून मक्याला पशुपालनात अतिशय महत्वाचे स्थान आहे.
अन्नधान्य म्हणून, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तसच मूल्यवर्धीत पदार्थ तयार करण्यासाठी साधा मका वापरला जातो. अन्नधान्य म्हणून आणि मूल्यवर्धीत पदार्थ निर्मीतीसाठी प्रथिनयुक्त मका उपयुक्त आहे. मक्याच्या शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.
बऱ्याच भागात जनावरांच्या आहारातील मका हे प्रमुख चारा पीक आहे. हिरव्या मक्यापासून उत्तम प्रतीचा मूरघास तयार करता येतो. सूप, लोणचे, भजी बनविण्यासाठी बेबीकॉर्न मक्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये मागणी असते. मक्या पासून बनवला जाणारा अतिशय लोकप्रीय पदार्थ म्हणजे पॉपकॉर्न. पॉपकॉर्न तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडीने खाल्ले जातात.पॉप कॉर्न बनविण्यासाठी मक्याच्या विशिष्ट जाती विकसीत करण्यात आल्या आहेत.
स्वीट कॉर्न म्हणजेच मधूमक्याची कणसे उकडून भाजून खाल्ली जातात. पर्यटन स्थळे याशिवाय शहरी भागात या मक्याला खूप मागणी असते. अस असलं तरी देशात मक्याची उत्पादकता खूपच कमी आहे. यामाग रोगराईचा प्रादुर्भाव, जनावरांचा त्रास, पाण्याची कमतरता ही मुख्य कारणं आहेत.जगातील प्रमुख मका उत्पादक देशांची तुलना केली तर उत्पादकतेत भारत खूपच पिछाडीवर आहे. भारतात कोरडवाहू मक्याचे प्रमाण जास्त आहे. हे पीक खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतल जात. बागायती क्षेत्रावर मका लागवड तुलनेने कमी आहे. सिंचनाच्या सुविधा वाढल्या आणि मक्यापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीला प्रोत्साहन मिळालं तर हे चित्र बदलू शकत, अस जाणकारांच मत आहे. त्यामुळे मका उत्पादन वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न होणं करगेच आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.